राष्ट्रवादी काँग्रेस महिला काँग्रेसच्या बीड शहराध्यक्षपदी राणी शेख गुलरुख जहीन यांची नियुक्ती
बीड प्रतिनिधी :-राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने बीड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी शेख राणी गुलरुख जहीन, शेख किश्वरुद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अँड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्षा व महासंसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती फौजियाताई खान, आमदार जयंतराव पाटील साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बीड विधानसभेचे आमदार संदीप भैया क्षीरसागर, माजी आमदार अँड उषाताई दराडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही नूतन शहराध्यक्ष शेख राणी यांनी दिली असून
पक्ष बळकटीकरणासोबतच पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
बीड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीबद्दल शेख राणी गुलरुख जहीन यांचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या वतीने अभिनंदन होत असून, त्यांच्या माध्यमातून बीड शहरात महिला संघटना अधिक सक्षम व गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment