अंबाजोगाई शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार कधी थांबणार-लोकजनशक्ती पार्टी (रा)

अंबाजोगाई शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार कधी थांबणार-लोकजनशक्ती पार्टी (रा)

बीड : 
अंबाजोगाई शासकीय रुग्णालय हे आशिया खंडातील सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय समजले जाते महाराष्ट्र शासनाच्या वतीने अंबाजोगाई शासकीय रुग्णालयाला कोठ्यावधींचा फंड दिला गेला परंतु शासकीय रुग्णालयातील कायमस्वरूपी अधिष्ठाता नियुक्ती रखडल्यामुळे संबंधित ठिकाणी टेम्परवारी अधिष्ठाता धपाटे सर हे आहेत अधिष्ठाता महोदयांना संबंधित रुग्णालयातील अनेक बाबींकडे लक्ष द्या असे राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांना वारंवार सांगावे लागत असल्यामुळे अंबाजोगाई शासकीय रुग्णालय हे रामभरोसे चालत असल्याचे दिसून येत आहे आज एवढ्या मोठ्या रुग्णालयात अपघात विभागात तीन ते चार ईसीजी मशीन आहेत एकाच पेशंटची ईसीजी टेस्ट केली तर वेगवेगळ्या मशीनवर वेगवेगळे रिपोर्ट येतात एवढ्या महत्त्वपूर्ण ठिकाणी अशा म्हणजेच चायना मेड सारख्या मशीन असतील तर हे रुग्णालय पेशंटच्या जीविताशी खेळत आहे असा आमचा ठाम आरोप आहे मागील आठ दिवसापासून आम्ही या मशीन चेक केल्या असता याच्या रिपोर्टमध्ये तपावत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे जेव्हा खाजगी मध्ये आम्ही संबंधित डॉक्टरांना चौकशी केली असता यातील अनेक मशिनरी या कोणत्यातरी सेवाभावी संस्थेने दिलेल्या आहेत अशी माहिती मिळत आहे संबंधित संस्थेकडून चायनामेड मशीन घेण्यापेक्षा शासनाने संबंधित मशीन रुग्णालयास उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे संबंधित रुग्णालयात पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही अनेक ब्लड टेस्ट या बाहेरून कराव्या लागतात येथील कंत्राटी होत असलेली भरती प्रक्रिया ही पैसे घेऊन केली जाते असा आरोप वारंवार होत आहे परंतु टेम्परवारी अधिष्ठाता श्री धपाटे सर यांचे या रुग्णालयात कोणी ऐकत नाही असे समोर येत आहे म्हणून लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने संबंधित रुग्णालयाला कायमस्वरूपी अधिष्ठाता देण्यात यावे अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे यांच्या वतीने लवकरच आरोग्य मंत्री यांना करण्यात येणार आहे याची नोंद प्रशासनाने घ्यावी व येथील ढिसाळ कारभार बंद करावा अन्यथा काही अनुचित प्रकार घडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही टेम्परवारी अधिष्ठाता श्री धपाटे सर यांची असेल

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी