धानोरा रोडच्या टाकीची स्वच्छता करून स्वच्छ पाणीपुरवठा पूर्ववत; नगरसेवक प्रमोद शिंदे यांची पहाटे पाहणी

धानोरा रोडच्या टाकीची स्वच्छता करून स्वच्छ पाणीपुरवठा पूर्ववत; नगरसेवक प्रमोद शिंदे यांची पहाटे पाहणी

​बीड प्रतिनिधी :-गेल्या चार ते पाच दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित असल्याने पाईपलाईनमधून गढूळ पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती. या समस्येची दखल घेत नगरसेवक प्रमोद शिंदे यांनी आज पहाटेच धानोरा रोडच्या टाकीवर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.
​नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी त्यांनी धानोरा टाकी वॉश आऊट करून घेत पाणीपुरवठा सुरळीत सुरू करून दिला. लवकरच टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रभागातील नागरिकांना सुरळीत व स्वच्छ पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती नगरसेवक शिंदे यांनी दिली आहे. नगरसेवकाने पहाटेच घेतलेल्या या पुढाकारामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी