शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन पाच हजार भाव द्या - नाहीतर साखर कारखाने चालू देणार नाही-- शिवसेना बीड उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ) खेडकर यांचा इशारा
शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन पाच हजार भाव द्या - नाहीतर साखर कारखाने चालू देणार नाही-- शिवसेना बीड उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ) खेडकर यांचा इशारा
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :
बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 5000 रुपये भाव दिला नाही तर , बीड जिल्ह्यात एकाही साखर कारखान्याचे चाक फिरू दिले जाणार नसल्याचा आक्रमक इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आष्टि/पाटोदा/शिरूर कासार उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ) खेडकर यांनी असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिला .
पुढे सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आणि शिवसेना नेते, माजी विरोधी पक्षनेते आ.अंबादास (दादा) दानवे, बीड जिल्हा संपर्कप्रमुख मा.अशोक सकपाळ साहेब.शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास (भैया) गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली ही भूमिका घेण्यात आल्याचे सांगितले.
शेतकरी दुष्काळाने होरपळला--
पुढे आजिनाथ (भाऊ) खेडकर यांनी सांगितले की, आज शेतकरी दुष्काळामुळे पूर्णपणे होरपळून गेला . रात्रंदिवस कष्ट करून, रक्ताचं पाणी करून शेतकऱ्याने ऊस पिकवला मात्र त्याच्या मालाला भावच नाही. आणखी किती दिवस या बळीराजाची पिळवणूक करणार ? शेतमालाला योग्य भाव कधी देणार? असा सवाल केला.
गेल्या दोन वर्षांपासून बळीराजा सतत संकटाला तोंड देत असून मागच्या वर्षी ओला दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि यावर्षी कोरड्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला .अशा परिस्थितीत शेतकऱ्याने जगायचं कसं? हाच मोठा प्रश्न निर्माण झाला .
सरकारची फक्त घोषणाबाजी-
सरकारच्या धोरणावर जोरदार टीका करताना खेडकर यांनी सांगितले की हे सरकार फक्त घोषणा करण्यात पटाईत असून प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातावर आणि खात्यात काहीच नाही. फसवी कर्जमाफी जाहीर केली, पण त्याचा लाभ एकाही शेतकऱ्याला प्रत्यक्षात झाला नाही .
ओल्या दुष्काळात सरकारने जाहीर केले होते की , ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या , त्या शेतकऱ्याला साडेतीन लाख रुपये मदत देऊत ,पण आज अख्ख्या महाराष्ट्रात एक तरी शेतकरी दाखवा ज्याला साडेतीन लाख रुपये प्रत्यक्षात मिळाले . या सरकारने फक्त वल्गना मोठ्या केल्या प्रत्यक्षात दिले तर काहीच नाही असा घणाघात केला.
उसाला प्रति टन पाच हजार भाव दिला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन--
आता जर माझ्या शेतकरी बांधवांना ऊसाला प्रतिटन पाच हजार रुपये हमीभाव सरकारने जाहीर करून दिला नाही तर ! बीड जिल्ह्यात एकही साखर कारखाना चालू देणार नाही. यासाठी जेल भोगावं लागले तरी चालेल, आणि प्रत्यक्षात गाडीचं चाक सुद्धा फिरू देणार नाही असा निर्धार आजिनाथ (भाऊ ) खेडकर यांनी व्यक्त केला .
येत्या काही दिवसात शिवसेना उपजिल्हाप्रमुख आजिनाथ (भाऊ ) खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे आंदोलन उभारले जाणार असून या आंदोलनात जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी सरकार आणि कारखानदार जबाबदार राहतील असा इशाराही त्यांनी दिला .
दरम्यान, आजिनाथ (भाऊ) खेडकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, शिवसैनिकांमध्येही मोठा उत्साह संचारला .
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना कायम रस्त्यावर असल्याचे शेवटी आजिनाथ (भाऊ) खेडकर यांनी सांगितले .
Comments
Post a Comment