भारतीय दलित पँथर चे मराठवाडा महासचिव तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व सन्मान
परळी ( प्रतिनिधी ) दिं. २८ परळी येथे भारतीय दलित पॅंथर च्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक जी.एस. सौंदळे सर, उप प्राचार्य चिंतामणी खंडागळे सर,पत्रकार सुकेशनी नाईकवाडे, माणिकराव बनसोडे यांचा सत्कार व सन्मान भारतीय दलित पँथर चे मराठवाडा महासचिव तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या हस्ते पुष्पहार, पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन करण्यात आला. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, परळी रेल्वे स्टेशन परिसर, परळी वैजनाथ जि. बीड येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय जी.एस. सौंदळे सर, चिंतामणी खंडागळे सर,पत्रकार सुकेशनी नाईकवाडे, माणिकराव बनसोडे यांचा सत्कार, सन्मान रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ०७:३० वाजता करण्यात आला आहे. यावेळी सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून धूप दीपचे प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी सामाजिक क्षेत्रात आपला अनमोल असा ठसा उठवणारे ज्येष्ठ समाजसेवक ...