भारतीय दलित पँथर चे मराठवाडा महासचिव तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व सन्मान



परळी ( प्रतिनिधी ) दिं. २८
परळी येथे भारतीय दलित पॅंथर च्या वतीने 
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक 
जी.एस. सौंदळे सर, उप प्राचार्य चिंतामणी खंडागळे सर,पत्रकार सुकेशनी नाईकवाडे, माणिकराव बनसोडे यांचा सत्कार व सन्मान भारतीय दलित पँथर चे मराठवाडा महासचिव तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या हस्ते पुष्पहार, पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन करण्यात आला.
      विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, परळी रेल्वे स्टेशन परिसर, परळी वैजनाथ जि. बीड येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय जी.एस. सौंदळे सर, चिंतामणी खंडागळे सर,पत्रकार सुकेशनी नाईकवाडे, माणिकराव बनसोडे यांचा सत्कार, सन्मान रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ०७:३० वाजता करण्यात आला आहे.
यावेळी सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून धूप दीपचे प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी सामाजिक क्षेत्रात आपला अनमोल असा ठसा उठवणारे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय जी.एस. सौंदळे सर यांनी नुकतेच गेल्या आठवड्यात गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. या अमरण उपोषणाची सर्व स्तरातून सकारात्मक दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन हिरवा सिग्नल दिल्यामुळे त्यांच्या या अनमोल कार्याची दखल घेऊन संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला आहे. 
याच कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवा उपप्राचार्य चिंतामणी खंडागळे सर यांच्याही सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेतली,
तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुकेशनी ताई नाईकवाडे यांची त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन संघटनेच्या वतीने त्यांचाही सन्मान व सत्कार करण्यात आला आहे. तसेच भारतीय दलित पॅंथर चे तालुका अध्यक्ष माणिकराव बनसोडे यांचा सामाजिक, पत्रकारिता या कार्याची दखल घेऊन,यासह मोजे नागापूर तालुका परळी वैजनाथ जि. बीड येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य सामाजिक न्याय भवनासाठी स्थानिक प्रशासनाकडे जागेची मागणी करून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल या सर्वांचा सत्कार, भारतीय दलित पँथर चे मराठवाडा महासचिव तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला. 
तसेच याच कार्यक्रमात भारतीय दलित पॅंथरच्या परळी शहर संघटक पदी अनिल सोनवणे सिद्धार्थ नगर, परळी वैजनाथ यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड सर यांनी देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. 
या छोटेखानी सुंदर अशा कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे मराठवाडा महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी केले, तर 
 सूत्रसंचालन भारतीय दलित पॅंथरचे बीड जिल्हा अध्यक्ष वैजनाथ गायकवाड सर यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय दलित पॅंथरचे शहराध्यक्ष धम्मदीप रोडे शहर उपाध्यक्ष दत्ता रायभोळे शहर सचिव विलास गायकवाड, सचिन शरणागत, आकाश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. अशी माहिती संघटनेचे शहर सचिव विलास गायकवाड यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी