लिंबागणेश येथे मध्यरात्री धाडसी चोरी; १५ लाखांचा ऐवज लंपास
लिंबागणेश येथे मध्यरात्री धाडसी चोरी; १५ लाखांचा ऐवज लंपास
३ लाखांची रोकड, १५ तोळे सोने व २० तोळे चांदी चोरीला; नेकनूर पोलिसांकडून तपास सुरू
बीड प्रतिनिधी : (दि.२७) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डवरवाडा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरीची घटना घडली. विलास बुवाजी जाधव यांच्या राहत्या घरातून सुमारे ३ लाख रुपये रोख, १५ तोळे सोने, २० तोळे चांदी असा एकूण सुमारे १५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे रिंकु अमोल जाधव यांनी सांगितले.
मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर तत्काळ नेकनूर पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस कर्मचारी नवनाथ मुंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व प्राथमिक चौकशी केली. चोरीप्रकरणी सकाळी तक्रार देण्यासाठी संबंधितांना नेकनूर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले.
या घटनेचा पुढील तपास नेकनूर पोलिस ठाण्याचे सपोनी मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चोरीच्या घटनेमुळे लिंबागणेश परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच दुष्काळाच्या संकटाला सामोरे जात असलेल्या ग्रामस्थांमध्ये चोरीच्या घटनांमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. पोलिसांनी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment