Posts

बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे पिडीत महिलेचा जीव धोक्यात

Image
बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे पिडीत महिलेचा जीव धोक्यात  पीडित महिलेच्या जीविताशी खेळणाऱ्या डॉक्टर व ऑपरेशन करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्या सर्वाना सेवेतून कायम स्वरूपी बडतर्फ करण्याची किशन तांगडे यांची मागणी. बीड : बीड येथील जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांच्या अत्यंत बेजबाबदार आणि अक्षम्य निष्काळजीपणामुळे एका तरुण महिलेच्या पोटात वैद्यकीय हँडग्लोव्हज (Hand gloves) विसरल्याची धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे पीडित महिला सौ. संध्या सूरज गायकवाड यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली असून, याप्रकरणी दोषी डॉक्टरांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी रिपाई बीड अध्यक्ष किशन तांगडे यांनी केली आहे. पीडित महिला संध्या गायकवाड यांना दि. ०१/०८/२०२६ रोजी बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, ड्युटीवर असणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अत्...

15 ऑगस्ट व 26 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अनिवार्य करा-नितीन सोनवणे

Image
15 ऑगस्ट व 26 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अनिवार्य करा-नितीन सोनवणे  शासकीय शिष्टाचारात स्वतंत्र जीआर जारी करण्याची ऑल इंडिया पँथर सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी बीड : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये अधिकृत शासकीय शिष्टाचाराचा भाग म्हणून अनिवार्य करण्यात यावे, अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे याबाबत निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून, संविधानाने देशाला लोकशाही, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेची मूल्ये दिली आहेत. त्यामुळे संविधान निर्मितीतील बाबासाहेबांचे योगदान अमूल्य आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, संस्था तसेच काही शासकीय कार्यालयांमध्ये 15 ऑगस्ट व 26 जानेवा...

परळी ग्रामीण तलाठी सज्जा बदलण्याची मागणी; शेतकरी व नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष - भागवत गीत्ते

Image
परळी ग्रामीण तलाठी सज्जा बदलण्याची मागणी; शेतकरी व नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष - भागवत गीत्ते परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी ग्रामीण तलाठी सज्जाचा तात्काळ बदल करण्यात यावा, अशी मागणी मलकापूर येथील भागवत रामकिशन गित्ते यांनी उपविभागीय अधिकारी, परळी वैजनाथ यांच्याकडे दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी लेखी अर्जाद्वारे केली आहे. अर्जात नमूद केल्यानुसार, परळी ग्रामीण तलाठी सज्जाचा कार्यभार तलाठी प्रतीक्षा बसापुरे या मागील सुमारे दोन वर्षांपासून सांभाळत आहेत. मात्र, या कालावधीत शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांची कामे अपेक्षित पद्धतीने होत नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. तलाठी सज्जाचा कारभार त्यांच्या हाताखालील व्यक्तींच्या माध्यमातून चालविला जात असल्याचा दावाही अर्जात करण्यात आला आहे. तसेच, परळी ग्रामीण परिसरातील रस्त्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये इतर व्यक्तींकडून पंचनामे तयार करून घेण्यात आले असून, काही नोंदी चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, तलाठी कार्यालयाशी संबंधित कामांसाठी त्यांच्या हाताखालील व्यक्तींकडून मनमानी पद्धतीने पैशांची मागणी केली जात ...

आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहालीत हातात पाण्याचे हंडे घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवर धडक

Image
भर पावसाळ्यातही पाण्यासाठी महिलांचा संघर्ष! आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहालीत हातात पाण्याचे हंडे घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवर धडक पाटोदा (प्रतिनिधी ) : आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहाली गावात भर पावसाळ्यातही महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत योजना राबविण्यात आल्याचा दावा असतानाही नळाला पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी सोमवारी हातात पाण्याचे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली. “भर पावसाळ्यातही पाण्यासाठी हंडे घेऊन फिरावे लागत असेल, तर जलजीवन मिशनचा फायदा नेमका कुणाला?” असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. लाखो रुपयांची योजना असूनही गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबलेली नाही, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली. जलजीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करून गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी महिलांनी केली. या पाणीप्रश्नासाठी शरद पवार यांच्या आमरण उपोषणाला महिलांनी पाठिंबा दर्शविला आहे. पावसाळ्यातही हंडे डोक्यावर; वहालीच्या महिलांचा प्रशासनाला संतप्त सवाल!

महाराष्ट्र राज्यातील ३४०० ग्राम साधन व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घ्या - बाजीराव ढाकणे

Image
महाराष्ट्र राज्यातील ३४०० ग्राम साधन व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घ्या - बाजीराव ढाकणे  बीड येथे ग्रामसाधन व्यक्तींच्या मागण्यांसाठी रोजगार हमी योजना मंत्री नामदार भरत गोगावले यांना निवेदन बीड | प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपातळीवर झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (Social Audit) करण्यासाठी महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये सन २०२३ मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे ३४०० ग्रामसाधन व्यक्तींना नियमित सेवेत सामावून घेत शासकीय स्तरावर योग्य स्वरूप देण्यात यावे, अशी मागणी बीड येथे रोजगार हमी योजना मंत्री ना. भरत (शेट) गोगावले यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात १३ ऑगस्ट २०२६ रोजी रोजगार हमी योजना मंत्री ना. भरत (शेट) गोगावले यांना बीड येथे निवेदन देण्यात आले. निवेदनावर बाजीराव नवनाथ ढाकणे,गणेश शंकर काळे, रज्जाक शेख व संजय बांगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्या २०२३ च्या पदभरती जाहिरातीनुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपातळीवर झालेल्या कामांचे सामाजिक ...

सरकारचे शैक्षणिक धोरण हेच विद्यार्थ्यांचे मरण ' जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; बीड जिल्ह्यातील ६५ शाळांमध्ये एकच शिक्षक, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Image
सरकारचे शैक्षणिक धोरण हेच विद्यार्थ्यांचे मरण ' जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; बीड जिल्ह्यातील ६५ शाळांमध्ये एकच शिक्षक, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान   कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध; अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थी संख्येनुसार पदमान्यता देण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे  बीड : (दि.१७) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होऊनही गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ८५० सरकारी शाळा बंद पडल्याचा मुद्दा उपस्थित करत कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी 'सरकारचे शैक्षणिक धोरण हेच विद्यार्थ्यांचे मरण'आणि 'शिक्षण हा आमचा हक्क आहे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्...

महुवाले परिवाराचा स्तुत्य उपक्रम: स्वर्गीय भारत महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निराधार वृद्धांसाठी मोफत उपचारांचे आयोजन

Image
महुवाले परिवाराचा स्तुत्य उपक्रम:  स्वर्गीय भारत महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निराधार वृद्धांसाठी मोफत उपचारांचे आयोजन ​बीड प्रतिनिधी :- समाजात ज्यांना कोणी सहारा नाही, ज्यांचे या जगात कोणी नातेवाईक उरले नाहीत अशा निराधारांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानत महुवाले परिवाराच्या वतीने एक आदर्श उपक्रम राबवण्यात आला. स्वर्गीय भारत जानकीराम महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शहरातील 'जिव्हाळा बेघर निवारा केंद्र' येथे राहणाऱ्या बेघर व निराधार व्यक्तींसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ​या शिबिरात कोणत्याही प्रकारचा आधार नसलेल्या वृद्धांची आणि रुग्णांची विशेष काळजी घेण्यात आली. यामध्ये खालील मोफत सेवा व उपचार देण्यात आले ​ रुग्णांसाठी मोफत मसाज आणि स्टीम थेरपी. जुनाट आजार व सांधेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आयुर्वेदिक पद्धतीचे 'अग्निकर्म' आणि 'विद्धकर्म' द्वारे मोफत उपचार करण्यात आले. ​"आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आठवणी जपताना समाजातील दुर्क्षित आणि निराधार घटकांना मदतीचा हात देणे हीच स्व. भारत महुवाले यांना खरी श्रद्...