सरकारचे शैक्षणिक धोरण हेच विद्यार्थ्यांचे मरण ' जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; बीड जिल्ह्यातील ६५ शाळांमध्ये एकच शिक्षक, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

सरकारचे शैक्षणिक धोरण हेच विद्यार्थ्यांचे मरण ' जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; बीड जिल्ह्यातील ६५ शाळांमध्ये एकच शिक्षक, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान 

 कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध; अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करून विद्यार्थी संख्येनुसार पदमान्यता देण्याची मागणी :- डॉ.गणेश ढवळे 
बीड : (दि.१७) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होऊनही गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील ८५० सरकारी शाळा बंद पडल्याचा मुद्दा उपस्थित करत कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

यावेळी 'सरकारचे शैक्षणिक धोरण हेच विद्यार्थ्यांचे मरण'आणि 'शिक्षण हा आमचा हक्क आहे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या यू-डायस प्लस अहवालानुसार, महाराष्ट्रातील एक शिक्षक असलेल्या शाळांची संख्या ९ हजारांवर पोहोचली असून २०२५-२६ या वर्षात त्यामध्ये १,१४४ ने वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यातील ६५ शाळांमध्ये मंजूर दोन पदे असतानाही केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शासनाच्या शाळा विलीनीकरणाच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून शिक्षणाच्या वाढत्या खाजगीकरणामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनूस, मुबीन शेख, माजी सैनिक अशोक येडे ( जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), सादेक सय्यद ( शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), बाळासाहेब मोरे पाटील ( शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष), किष्किंधा पांचाळ ( जिल्हाध्यक्ष विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज बीड), नितीन सोनवणे ( राज्य प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना बीड),सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुटे, हनुमान घोडके, अँड. प्राचार्य राजकुमार कदम( सरचिटणीस मराठवाडा शिक्षक संघ), प्राचार्य डी. जी. तांदळे मार्गदर्शक मराठवाडा शिक्षक संघ बीड),ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे, बाजीराव ढाकणे, राजेंद्र आमटे,प्रा.ज्ञानेश्वर राऊत( संघटक आम आदमी पार्टी बीड),पठाण रफिक (शहर उपाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड, विठ्ठल डोळस, आदी सहभागी झाले होते.



  महाराष्ट्रात ५ वर्षांत ८५० सरकारी शाळा बंद

* राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर देशातील १८,७२७ शाळा बंद.
* महाराष्ट्रातील ८५० सरकारी शाळांचे अस्तित्व संपुष्टात.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर परिणाम.



  बीड जिल्ह्यातील ६५ शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक

* जिल्ह्यातील ६५ शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत.
* मंजूर दोन पदांपैकी एक पद रिक्त.
* एका शिक्षकावर पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व वर्गांची जबाबदारी.
* प्रशासकीय कामासाठी शिक्षक बाहेर गेल्यास शाळा शिक्षकविरहित.


 आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा.
 एक शिक्षक असलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करावी.
 विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक पदांना मान्यता द्यावी.
आधार पडताळणीच्या अटींमध्ये शिथिलता आणावी.
 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवावा.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी