महुवाले परिवाराचा स्तुत्य उपक्रम: स्वर्गीय भारत महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निराधार वृद्धांसाठी मोफत उपचारांचे आयोजन

महुवाले परिवाराचा स्तुत्य उपक्रम: 
स्वर्गीय भारत महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त निराधार वृद्धांसाठी मोफत उपचारांचे आयोजन
​बीड प्रतिनिधी :- समाजात ज्यांना कोणी सहारा नाही, ज्यांचे या जगात कोणी नातेवाईक उरले नाहीत अशा निराधारांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानत महुवाले परिवाराच्या वतीने एक आदर्श उपक्रम राबवण्यात आला. स्वर्गीय भारत जानकीराम महुवाले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शहरातील 'जिव्हाळा बेघर निवारा केंद्र' येथे राहणाऱ्या बेघर व निराधार व्यक्तींसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
​या शिबिरात कोणत्याही प्रकारचा आधार नसलेल्या वृद्धांची आणि रुग्णांची विशेष काळजी घेण्यात आली. यामध्ये खालील मोफत सेवा व उपचार देण्यात आले
​ रुग्णांसाठी मोफत मसाज आणि स्टीम थेरपी. जुनाट आजार व सांधेदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आयुर्वेदिक पद्धतीचे 'अग्निकर्म' आणि 'विद्धकर्म' द्वारे मोफत उपचार करण्यात आले.
​"आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आठवणी जपताना समाजातील दुर्क्षित आणि निराधार घटकांना मदतीचा हात देणे हीच स्व. भारत महुवाले यांना खरी श्रद्धांजली आहे," अशी भावना यावेळी आयोजकांनी व्यक्त केली. महुवाले परिवाराच्या या संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे बीड शहरातून आणि जिव्हाळा निवारा केंद्रातील सदस्यांकडून मनःपूर्वक कौतुक होत आहे
या वेळी मनोरमा भारत महुवाले, राजु भारत महुवाले, डॉ अंबिका संदीप नरवाडे, बालाजी भारत महुवाले, राजु पापालाल बडोदे, सौ चंदाताई राजु महुवाले, अनिकेत राजु बडोदे, सृष्टी राजु महुवाले, अनुष्का राजु बडोदे, श्लोक राजु महुवाले, आरुष बालाजी महुवाले, व मीस्टी संदीप अंबिका नलवडे व आदी परीवार उपस्थित होता

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी