बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे पिडीत महिलेचा जीव धोक्यात


बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे पिडीत महिलेचा जीव धोक्यात

 पीडित महिलेच्या जीविताशी खेळणाऱ्या डॉक्टर व ऑपरेशन करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्या सर्वाना सेवेतून कायम स्वरूपी बडतर्फ करण्याची किशन तांगडे यांची मागणी.
बीड: बीड येथील जिल्हा रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांच्या अत्यंत बेजबाबदार आणि अक्षम्य निष्काळजीपणामुळे एका तरुण महिलेच्या पोटात वैद्यकीय हँडग्लोव्हज (Hand gloves) विसरल्याची धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे पीडित महिला सौ. संध्या सूरज गायकवाड यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली असून, याप्रकरणी दोषी डॉक्टरांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी रिपाई बीड अध्यक्ष किशन तांगडे यांनी केली आहे.

पीडित महिला संध्या गायकवाड यांना दि. ०१/०८/२०२६ रोजी बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्यावर सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, ड्युटीवर असणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अत्यंत निष्काळजीपणे काम करत शस्त्रक्रियेदरम्यान वापरले जाणारे हँडग्लोव्हज थेट महिलेच्या पोटातच विसरले.दि. ०४/०८/२०२६ रोजी रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच संध्या यांच्या पोटात तीव्र कळा येऊन उलट्या व ताप येण्यास सुरुवात झाली. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी वडवणी येथील डॉ. अरुण झिंजुर्डे यांच्याकडे नेऊन सोनोग्राफी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोटात हँडग्लोव्हज राहिल्यामुळे पोटातील आतडे सडून गर्भाशय काढून टाकण्याची अत्यंत गंभीर वेळ या निष्पाप महिलेवर आली आहे. 

सध्या त्यांच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात पुढील उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

या प्रकरणी किशन तांगडे यांनी प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:

. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत तातडीने चौकशी करण्यात यावी.

२. पीडित महिलेचा जीव धोक्यात घालणाऱ्या बीड जिल्हा रुग्णालयातील संबंधित निष्काळजी डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे.

 ३. एका गरीब कुटुंबातील तरुण महिलेला डॉक्टरांच्या चुकीमुळे कायमचे अपंगत्व (मातृत्व गमावणे व आतड्यांचे नुकसान) पत्करावे लागले आहे, त्यामुळे शासनाने तिच्या संपूर्ण उपचाराचा खर्च उचलून कुटुंबाला मोठी आर्थिक मदत द्यावी.

या अत्यंत गंभीर व संवेदनशील प्रकरणात जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही रिपाई बीड अध्यक्ष- किशन तांगडे यांनी दिला आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी