आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहालीत हातात पाण्याचे हंडे घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवर धडक
भर पावसाळ्यातही पाण्यासाठी महिलांचा संघर्ष!
आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहालीत हातात पाण्याचे हंडे घेऊन महिलांची ग्रामपंचायतीवर धडक
पाटोदा (प्रतिनिधी) : आष्टी विधानसभा मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील वहाली गावात भर पावसाळ्यातही महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत योजना राबविण्यात आल्याचा दावा असतानाही नळाला पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी सोमवारी हातात पाण्याचे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली.
“भर पावसाळ्यातही पाण्यासाठी हंडे घेऊन फिरावे लागत असेल, तर जलजीवन मिशनचा फायदा नेमका कुणाला?” असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. लाखो रुपयांची योजना असूनही गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबलेली नाही, अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
जलजीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करून गावातील पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी महिलांनी केली. या पाणीप्रश्नासाठी शरद पवार यांच्या आमरण उपोषणाला महिलांनी पाठिंबा दर्शविला आहे.
पावसाळ्यातही हंडे डोक्यावर; वहालीच्या महिलांचा प्रशासनाला संतप्त सवाल!
Comments
Post a Comment