प्रवास चोरी करणारी महिला पोलिसांच्या तावडीत; अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
प्रवास चोरी करणारी महिला पोलिसांच्या तावडीत; अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांची धडक कारवाई बीड (प्रतिनिधी ): प्रवासादरम्यान प्रवाशांचे दागिने व रोकड लांबवणाऱ्या एका महिला आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB), बीड यांच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या महिलेकडून १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३६/२०२६ (कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता - BNS) चा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपास सुरू असताना, या गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी एक महिला बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने गोरे वस्ती परिसरात तात्काळ जाऊन संशयित महिलेस ताब्यात घेतले. तिची सखोल चौकशी केली असता, तिने सदर चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिली. तिच्या ताब्यातून पोलिसांनी १७ ग्रॅम सोन्याचे दागिने...