Posts

पिक कर्जासाठी लिंबागणेश येथे गुरुवारी रास्तारोको

Image
पिक कर्जासाठी लिंबागणेश येथे गुरुवारी रास्तारोको!  महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्जदार व जामीनदार शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारले ; जाचक अटी शिथिल करण्याची मागणी — डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश : (दि.१३ )बीड विभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार वैयक्तिक कर्जाची थकबाकी तसेच जामीनदार म्हणून असलेल्या थकीत देयकांचे कारण पुढे करून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश शाखेकडून शेतकऱ्यांचे पिक कर्जाचे प्रस्ताव स्वीकारले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अटींमुळे शेतकऱ्यांची आर्थिक, शारीरिक व मानसिक पिळवणूक होत असल्याचा दावा करत संबंधित अटींमध्ये शिथिलता आणावी आणि पिक कर्ज वाटपाची प्रक्रिया जलदगतीने राबवावी, या मागणीसाठी गुरुवार, दि. १५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, लिंबागणेश येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून, यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषिमंत्री दत्तामा...

बीडमध्ये १७ ऑक्टोबरला आम आदमी पार्टीचे घंटानाद आंदोलन

Image
 बीडमध्ये १७ ऑक्टोबरला आम आदमी पार्टीचे घंटानाद आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनामा द्या SIR प्रक्रिया रद्द करण्यासह निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत उपस्थित केले जाणार प्रश्न; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन बीड, प्रतिनिधी : देशातील निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह राहावी, तसेच मतदारांचे अधिकार सुरक्षित राहावेत, या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. “घंटा वाजवा, देश जागवा!” या घोषणेसह होणाऱ्या या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि SIR (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे. आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक बजरंग येडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची असून, निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. मात्र, म...

नगरसेविका महिला बालकल्याण सभापती आरतीताई बनसोडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा नवदुर्गा पुरस्कार जाहीर

Image
नगरसेविका महिला बालकल्याण सभापती आरतीताई बनसोडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा नवदुर्गा पुरस्कार जाहीर    ​बीड प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा आणि प्रतिष्ठित नवदुर्गा पुरस्कार बीड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सौ. आरतीताई रणजीत बनसोडे यांना जाहीर झाला आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.   "स्वतःच्या स्वप्नांसाठी लढा, कारण स्त्री सक्षम झाली, तर समाज आणि देश प्रगती करतो," या ब्रीदवाक्याला प्रमाण मानून सौ. आरतीताई बनसोडे यांनी महिला कल्याण, बालविकास आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. नगरसेविका आणि महिला व बालकल्याण सभापती म्हणून काम करताना त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे.   महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून ‘नवदुर्गा पुरस्कार’ जाहीर झाल्याची बातमी समजताच बीड शहर व परिसरातून सौ. आरतीताई बनसोडे यांच्यावर कौतुकाचा ...

बीडमध्ये १३ ऑक्टोबरला ‘किशोर कुमार की यादे’ संगीत मैफलीचे आयोजन

Image
बीडमध्ये १३ ऑक्टोबरला ‘किशोर कुमार की यादे’ संगीत मैफलीचे आयोजन;  संगीतप्रेमींसाठी प्रवेश विनामूल्य   ​बीड प्रतिनिधी : हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि लोकप्रिय पार्श्वगायक, अभिनेते स्वर्गीय किशोर कुमार यांच्या अजरामर गाण्यांना आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी बीडमध्ये ‘किशोर कुमार की यादे’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. किशोर कुमार फॅन्स क्लब व कलाकार ग्रुप, बीड यांच्या वतीने मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नगर रोडवरील हॉटेल ऑलिव्ह हॉल (तिसरा मजला) येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. संगीतप्रेमींना या मैफलीचा आनंद पूर्णपणे विनामूल्य घेता येणार आहे.   ​ किशोर कुमार यांनी आपल्या वैविध्यपूर्ण आवाजात प्रेमागीतातून विरहीगीतांपर्यंत आणि विनोदी गीतांपासून भावस्पर्शी रचनांपर्यंत प्रत्येक गाण्याला वेगळी उंची दिली. हाच अनोखा संगीताचा अनुभव बीडकरांना मिळावा, या उद्देशाने या मैफलीत आशा भारती, अस्मिता अहिर, मिस तनिष्का, अश्विनी गवळी, रतन सबाई, शाम माने आणि डॉ. सुधीर साळवी हे कसलेले गायक किशोर कुमार यांच्या गाजलेल्या गीतांचे सुर...

माध्यम स्वातंत्र्यावरील हल्ल्याचा निषेध! लोकशाही वाचवा -देश वाचवा

Image
माध्यम स्वातंत्र्यावरील हल्ल्याचा निषेध! लोकशाही वाचवा -देश वाचवा  अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांची निदर्शने :- डॉ.गणेश ढवळे  बीड (प्रतिनिधी) ( दि.१२ ) नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांना अडवणे, त्यांना ताब्यात घेणे, पोलिसांकडून मारहाण व दडपशाही केल्याचे आरोप तसेच आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांशी गैरवर्तन, प्रेस कार्ड दाखवुनही ताब्यात घेऊन गाडीत टाकणे या माध्यमांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज दि.१२ सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानिक अधिकार आणि माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा आरोप करत, सरकारच्या अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी...

आजीच्या अंत्यविधीसाठी अभिजित दीपके यांना उपस्थित राहू देणार का? पोलिसांच्या भूमिकेवर डॉ. जितीन वंजारे यांचा सवाल

Image
आजीच्या अंत्यविधीसाठी अभिजित दीपके यांना उपस्थित राहू देणार का? पोलिसांच्या भूमिकेवर डॉ. जितीन वंजारे यांचा सवाल           अभिजित दीपके यांच्यावर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई सुरू आहे?  कुटुंबातील दुःखाच्या प्रसंगी त्यांना अंत्यविधीसाठी उपस्थित राहण्याची संधी मिळणार की नाही?डॉ. जितीन वंजारे यांची प्रशासनाला विचारणा मानवी हक्क आणि कायदेशीर बाबींवर डॉ जितीन वंजारे यांनी प्रश्न केला.विद्यार्थी नेते अभिजित दीपके यांच्या आजी कालकथित सावित्रीबाई शंकर दीपके यांचे शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर अभिजित दीपके यांना आजीच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहता येणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात ठेवल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकरणात पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे.या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अभिजित दिपके यांचे मेव्हणे डॉ. जितीन वंजारे यांनी अभिजित दीपके यांना त्यांच्या आजीच्या अंत्यवि...

दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना उभारी देणाऱ्या नाना पाटेकरांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन कट्ट्यावर सामाजिक कार्यकर्त्यांकडुन भावपूर्ण श्रद्धांजली

Image
दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना उभारी देणाऱ्या नाना पाटेकरांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन कट्ट्यावर सामाजिक कार्यकर्त्यांकडुन भावपूर्ण श्रद्धांजली! बीड : (दि.९) दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जगण्याचे बळ देणारे, जलसंधारणाच्या माध्यमातून नद्यांना पुनरुज्जीवन देणारे ज्येष्ठ अभिनेते तथा नाम फाऊंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांच्या निधनाने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात केलेल्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा देत सामाजिक कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी (दि.९) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन कट्ट्यावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला. जलसंधारणाच्या कामांमुळे हजारो हेक्टर शेतीला पाण्याचा आधार मिळाला, तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीसोबतच जगण्याची नवी उमेद मिळाली. संकटाच्या का...