बीडमध्ये १३ ऑक्टोबरला ‘किशोर कुमार की यादे’ संगीत मैफलीचे आयोजन

बीडमध्ये १३ ऑक्टोबरला ‘किशोर कुमार की यादे’ संगीत मैफलीचे आयोजन;
 संगीतप्रेमींसाठी प्रवेश विनामूल्य  

​बीड प्रतिनिधी :हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि लोकप्रिय पार्श्वगायक, अभिनेते स्वर्गीय किशोर कुमार यांच्या अजरामर गाण्यांना आणि आठवणींना उजाळा देण्यासाठी बीडमध्ये ‘किशोर कुमार की यादे’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. किशोर कुमार फॅन्स क्लब व कलाकार ग्रुप, बीड यांच्या वतीने मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नगर रोडवरील हॉटेल ऑलिव्ह हॉल (तिसरा मजला) येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. संगीतप्रेमींना या मैफलीचा आनंद पूर्णपणे विनामूल्य घेता येणार आहे.  
​
किशोर कुमार यांनी आपल्या वैविध्यपूर्ण आवाजात प्रेमागीतातून विरहीगीतांपर्यंत आणि विनोदी गीतांपासून भावस्पर्शी रचनांपर्यंत प्रत्येक गाण्याला वेगळी उंची दिली. हाच अनोखा संगीताचा अनुभव बीडकरांना मिळावा, या उद्देशाने या मैफलीत आशा भारती, अस्मिता अहिर, मिस तनिष्का, अश्विनी गवळी, रतन सबाई, शाम माने आणि डॉ. सुधीर साळवी हे कसलेले गायक किशोर कुमार यांच्या गाजलेल्या गीतांचे सुरेल सादरीकरण करणार आहेत.  
​
या कार्यक्रमाला समाजसेवक जावेद भैया कुरेशी, प्रमुख अतिथी किशोरजी कागदे आणि फारुकअली पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी बबनराव वडमारे आणि ॲड. अविनाश गडगे यांनी सांभाळली आहे.  
​शहरातील तसेच परिसरातील सर्व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी