बीडमध्ये १७ ऑक्टोबरला आम आदमी पार्टीचे घंटानाद आंदोलन
बीडमध्ये १७ ऑक्टोबरला आम आदमी पार्टीचे घंटानाद आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनामा द्या
SIR प्रक्रिया रद्द करण्यासह निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबाबत उपस्थित केले जाणार प्रश्न; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बीड, प्रतिनिधी : देशातील निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह राहावी, तसेच मतदारांचे अधिकार सुरक्षित राहावेत, या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. “घंटा वाजवा, देश जागवा!” या घोषणेसह होणाऱ्या या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि SIR (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक बजरंग येडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची असून, निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत उपस्थित होत असलेल्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात येणार आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
१. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा.
२. देशातील निवडणूक प्रक्रिया स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
३. मतदारांच्या अधिकारांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करत SIR प्रक्रिया रद्द करण्यात यावी.
४. मतदार यादी पुनरीक्षणादरम्यान कोणत्याही पात्र मतदाराचे नाव अन्यायकारकपणे वगळले जाणार नाही, याची खात्री द्यावी.
५. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
लोकशाहीप्रेमींना सहभागी होण्याचे आवाहन
या घंटानाद आंदोलनात सर्वसामान्य नागरिक, तरुण, सामाजिक संघटना आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
“लोकशाही वाचवा, मतदारांचे अधिकार जपा!” या घोषणेसह आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाची माहिती संबंधित प्रशासन व पोलीस यंत्रणेलाही देण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आंदोलनाचा तपशील :- दिनांक : शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६- वेळ : सकाळी १०:३० वाजता
-स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, बीड आयोजक : आम आदमी पार्टी, बीड
माजी सैनिक अशोक बजरंग येडे
जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी , सय्यद सादेक शहराध्यक्ष रफिक पठाण जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जगताप तालुका अध्यक्ष आजम खान तालुका उपाध्यक्ष कैलास चंद पालीवाल कोषाध्यक्ष दत्ता सुर्वसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment