नगरसेविका महिला बालकल्याण सभापती आरतीताई बनसोडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा नवदुर्गा पुरस्कार जाहीर

नगरसेविका महिला बालकल्याण सभापती आरतीताई बनसोडे यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा नवदुर्गा पुरस्कार जाहीर
  
​बीड प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा आणि प्रतिष्ठित नवदुर्गा पुरस्कार बीड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सौ. आरतीताई रणजीत बनसोडे यांना जाहीर झाला आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.  
"स्वतःच्या स्वप्नांसाठी लढा, कारण स्त्री सक्षम झाली, तर समाज आणि देश प्रगती करतो," या ब्रीदवाक्याला प्रमाण मानून सौ. आरतीताई बनसोडे यांनी महिला कल्याण, बालविकास आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. नगरसेविका आणि महिला व बालकल्याण सभापती म्हणून काम करताना त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर आणि महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे.  
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून ‘नवदुर्गा पुरस्कार’ जाहीर झाल्याची बातमी समजताच बीड शहर व परिसरातून सौ. आरतीताई बनसोडे यांच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना या यशाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी