लिंबागणेश येथे दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात महसूल, कृषी व ग्रामविकास यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर
लिंबागणेश येथे दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात महसूल, कृषी व ग्रामविकास यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर; वस्तुनिष्ठ नोंदीवर प्रशासनाचा भर बीड प्रतिनिधी : (दि.०३) दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यात पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या कामाला वेग आला असून, महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाची यंत्रणा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दि. १ ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यात दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रशासनाला पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तसेच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बीड तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या आदेशाने तालुक्यात गावनिहाय पथके तैनात करण्यात आली आहेत. सुधारित पंचनामा आदेशानुसार गावनिहाय पथकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक गावासाठी ग्राममहसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांचा समावेश असलेली ग्रामस्तरीय यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. संबंधित पोलिस पाट...