डॉ.भीमराव पिंगळे विद्यालयात सायबर सेलचे मार्गदर्शन शिबिर संपन्न
डॉ.भीमराव पिंगळे विद्यालयात सायबर सेलचे मार्गदर्शन शिबिर संपन्न
बीड: डॉ. भीमराव पिंगळे विद्यालयात सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सायबर सेलचे अधिकारी उबाळे साहेब, पंचम वडमारे साहेब आणि जाधव साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, सोशल मीडिया हाताळताना घ्यायची काळजी, ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव कसा करावा, याविषयी सविस्तर व मोलाची माहिती दिली.
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment