Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ट्रेनी शिक्षक सह सर्व प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी रुजू करावे.

Image
 गेवराई प्रतिनिधी ÷महाराष्ट्र राज्य महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवून ट्रेनी शिक्षक, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, आरोग्य विभाग अश्या अनेक जागेवर शासकीय व संस्थेच्या जागेवर सहा महिने करीता त्यांना काम करण्याची संधी दिली, येत्या दोन महिन्यांत त्यांचा कालावधी संपणार आहे, काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक-युवतीचा कालावधी वाढवून त्यांना कायमस्वरूपी आहे त्या जागेवर रूजू करावे अशी मागणी सर्व ट्रेनी शिक्षकांच्या वतीने अलीम सय्यद, नितिन आगम, सोपान संत, गणेश काशीद, महेश काकडे, विकास मगर,राठोड सर यांनी केली. या संदर्भात नागपूर येथे आमदार अंबादास दानवे, आमदार नितिन राऊत, आमदार रोहित पवार,आमदार कैलास पाटील, आमदार राजू नवघरे, आमदार मोनिकाताई राजले, आमदार मुफ्ती इस्माईल, आमदार प्रवीण स्वामी सह अनेक आमदारांना निवेदनात नमूद केले आहे की, सर्व प्रशिक्षणर्थींना कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. त्या अनुषंगाने निवेदनात नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्या वे...

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील ट्रेनी शिक्षिकेची निवड नियमबाह्य ; योग्य उमेदवार निवडीसाठी धरणे आंदोलन

Image
बीड:- ( दि.२१ ) बीड तालुक्यातील च-हाटा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ट्रेनी शिक्षिकेची निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने शासनाचे नियम डावलून केली आहे. संबंधित प्रकरणात गटशिक्षणाधिकारी यांनी लेखी आदेश देऊनही नियुक्ती न दिल्याने श्रीमती पिंगळे निकिता बाळु यांचे नातेवाईक आणि सहकारी यांनी काल दि.२० शुक्रवार रोजी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले होते. शिक्षणाधिकारी यांनी संबंधित आंदोलन प्रकरणी गटशिक्षणाधिकारी बीड यांना लेखी आदेश देऊनही दुपारपर्यंत कोणीही आंदोलनाची दखल घेतली नाही.आंदोलनकर्ते यांच्या विनंतीवरून सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन भगवान फुलारी ,शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) जिल्हा परिषद बीड यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर विस्तार अधिकारी उत्तमराव पवार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन संपूर्ण चौकशी करून मंगळवार पर्यंत अहवाल देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.   मुख्याध्यापिका परदेशी यांनी नियमबाह्य निवड केली असुन त्यांच्यावर कारवाई करून मला ...

मुलांच्या शिक्षणाकरिता अर्धपोटी उपाशी रहा पण शिकवा सांगणारे संत गाडगेबाबा चालते बोलते विद्यापीठ होय-प्राचार्य सुशील कुमार गायकवाड

Image
   बीड(प्रतिनिधी ) पुस्तके बोलत नाहीत पण त्यांना वाचणारे बोलू लागतात तरी मुलांच्या शिक्षणाकरिता अर्धपोटी उपाशी रहा पण मुला - मुलींना शिकवा सांगणारे संत गाडगेबाबा चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी आपल्या कीर्तनातून सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत अंधश्रद्धा मुक्ती, मानव सेवा म्हणजेच ईश सेवा, अनिष्ट रूढी परंपराचा त्याग व माणसातच देव आहे असे समजून माणसाची सेवा याबद्दल केलेल्या अमोल उपदेशाप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल ठेवणे हेच संत गाडगेबाबांच्या स्मृतिदिनी खरी भावपूर्ण आदरांजली ठरेल असे प्रतिपादन महामानवा अभिवादन ग्रुपने आयोजित केलेल्या प्रकाश आंबेडकर नगर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी लाभलेले प्राचार्य सुशीलकुमार गायकवाड यांनी केले. याप्रसंगी से.नि. जिल्हा प्रबंधक (एलआयसी) यू.एस. वाघमारे व प्रशांत वासनिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, वाचाल तर वाचालचे अध्यक्ष डी.जी. वानखेडे समता सैनिक दलाचे मेजर कॅप्टन राजाभाऊ आठवले, डॉक्टर जगदीश वाघमारे, एड. तेजस वडमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.        भारतरत्न डॉक्...

बीड च्या मानसी मनोज काळे चे अबॅकस परीक्षेत घवघवीत यश

Image
बीड दि. २०( प्रतिनिधी ) पुणे येथे झालेल्या जी चॅम्प अबॅकस संचलित गणेश काळे क्रीडांगण मंच स्वारगेट पुणे या ठिकाणी १५ डिसेंबर २०२४ रविवार जी - चॅम्प नॅशनल लेवल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेत देशभरात सुमारे सुमारे ५००० विद्यार्थ्यांच्या सहभाग झालेला होता. यामध्ये निक कोचिंग क्लासेस स्वराज्य नगर बीड येथील मानसी मनोज काळे हीने 4th लेवल मध्ये सुपरस्टार बक्षीस मिळवले. क्लास संपर्क- 8421390795/9403040279 विद्यार्थ्यांच्या यशाच्या मागे जी - चॅम्प अबॅकस क्लासेसच्या संचालिका सौ. जया तिरगुळ मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन ठरले. तसेच क्लासेसचे यश पाहून जया तिळगुळ मॅडम यांना नॅशनल लेवल बेस्ट टीचर व बेस्ट फेंचाइसी प्रथम क्रमांकाने (पुणे) गौरवण्यात आले. मुलांच्या व क्लासेच्या यशाच्या मागे शिक्षक स्टाफचाही मोलाचा वाटा आहे. यामध्ये सो.जयश्री जाधव मॅडम, कु. कुणीका फाटक मॅडम, सौ पल्लवी निकाळजे मॅडम, यांनीही मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.  या स्पर्धेचे आयोजन पुणे येथे जी - चॅम्प अबॅकस चे डायरेक्टर श्री. योगेश देशमाने सर व सौ. आरती देशमाने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात ...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्रपाली साबळे उत्कृष्ट अभिनयासाठी सन्मानित

Image
बीड प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाने पार पडली,राज्य नाट्य स्पर्धेत बीड व संभाजी नगर केंद्रावर बीड जिल्हा ,धाराशिव जिल्हा ,जालना जिल्हा आणि संभाजी नगर जिल्हा मिळून असे एक केंद्रात साधरील स्पर्धा दिनांक २५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर क्या दरम्यान अतिशय आनंदी व जल्लोषात पार पडली आहे .सदरील स्पर्धेत चार जिल्ह्यातून एकूण सोळा नाटके सादर झाली आहेत ,त्यात बीड येथील न्यू प्रगती महिला सेवा भावी संस्था च्या वतीने डॉ. आरुण जऱ्हाड लिखित व प्राध्यापक विनोद दळवी दिग्दर्शित द अँनॉमली हे नाटक सादर करण्यात आले होते सदरील नाटकाने रसिक मायबाप प्रेक्षकाची मने जिंकल्या मुळे रसिक प्रेक्षकांनी नाटकास टाळ्यांच्या गजरात नाट्य गृहातील सर्व प्रेक्षक नाटकाशी एकरूप होऊन नाटकातील कलाकारांच्या सादरीकरणाला दाद देत होते. सदरील नाटकात आम्रपाली साबळे यांनी सुचिता नावाची आईची भूमिका साकारली होती,आम्रपाली यांनी रंगमंचावर सुचिता ची भूमिका साकारत असताना प्रेक्षा गृहातील प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते व टाळ्या...

संविधानाची तोडफोड करणाऱ्या आरोपीच्या पाठीमागील मास्टरमाईड शोधा -महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष

Image
 बीड ( सखाराम पोहिकर ) परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील काचेच्या पेटीत असणारे भारतीय संविधानाची प्रस्ताविकाचे तोडफोड काही समाजकंटकांनी केली हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे व प्रशासनाच्या निकाळगीपणामुळे झाले आहे असे समजत आहे तरी शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाने त्वरित 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणीचे निवेदन आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्यावतीने पक्षप्रमुख बहुजनाचे नेते संजय भैय्या सोनवणे यांच्या आदेशानुसार व बीड जिल्हा अध्यक्ष विकास गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गेवराई तेथील कार्यालयाचे तहसीलदार साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब यांच्याकडे केली आहे यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे व या आरोपीच्या पाठीमागे मास्टर माईंड कोण आहे याचा शोध घ्यावा व परभणी पोलिसांनी चालवलेले गोविंद ऑपरेशन त्वरित थांबवावे तसेच निरपराध भीमसैनिकावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बीड जिल्हा उ...

गौण खनिज विभागातील कर्मचाऱ्यांने पत्रकारांना धमकावणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा

Image
गौण खनिज विभागातील कर्मचाऱ्यांने पत्रकारांना धमकावणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा :- डॉ.गणेश ढवळे  बीड:- ( दि.२० ) दैनिक वास्तव बीडचे संपादक जितेंद्र सिरसाट यांनी दि.१९ डिसेंबर २०२४ रोजी " बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची बोली लावाच! " या मथळ्याखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज अनुषंगाने होणारी आर्थिक लुट अनुषंगाने बातमी केल्याने संपादक जितेंद्र सिरसाट यांना जिल्हाधिकारी कार्यालयातुन महिला कर्मचाऱ्यांने फोनवरून वापरलेली एकेरी भाषा व उचलून आणण्यात येईल अशी गर्भित धमकी वजा दमदाटी केल्यामुळे एकंदरीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारीतेवर हा हल्ला असुन यांच्या निषेधार्थ आणि संबंधित प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व बीड तालुकाध्यक्ष शिवशर्मा शेलार, ऑल इंडिया पॅंथर सेना बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी अपर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर आणि जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे. बीड जिल्ह्...