मुलांच्या शिक्षणाकरिता अर्धपोटी उपाशी रहा पण शिकवा सांगणारे संत गाडगेबाबा चालते बोलते विद्यापीठ होय-प्राचार्य सुशील कुमार गायकवाड


 
 बीड(प्रतिनिधी) पुस्तके बोलत नाहीत पण त्यांना वाचणारे बोलू लागतात तरी मुलांच्या शिक्षणाकरिता अर्धपोटी उपाशी रहा पण मुला - मुलींना शिकवा सांगणारे संत गाडगेबाबा चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी आपल्या कीर्तनातून सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत अंधश्रद्धा मुक्ती, मानव सेवा म्हणजेच ईश सेवा, अनिष्ट रूढी परंपराचा त्याग व माणसातच देव आहे असे समजून माणसाची सेवा याबद्दल केलेल्या अमोल उपदेशाप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल ठेवणे हेच संत गाडगेबाबांच्या स्मृतिदिनी खरी भावपूर्ण आदरांजली ठरेल असे प्रतिपादन महामानवा अभिवादन ग्रुपने आयोजित केलेल्या प्रकाश आंबेडकर नगर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी लाभलेले प्राचार्य सुशीलकुमार गायकवाड यांनी केले. याप्रसंगी से.नि. जिल्हा प्रबंधक (एलआयसी) यू.एस. वाघमारे व प्रशांत वासनिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, वाचाल तर वाचालचे अध्यक्ष डी.जी. वानखेडे समता सैनिक दलाचे मेजर कॅप्टन राजाभाऊ आठवले, डॉक्टर जगदीश वाघमारे, एड. तेजस वडमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बबीता गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.अशोक गायकवाड यांनी करून महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचाल फिरते वाचनालय राबवीत असलेल्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी महामानव अभिवादन ग्रुप तर्फे मान्यवरांच्या हस्ते उपस्थित 80 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वही - पेन) वाटप केले. तर अभिवादन ग्रुप चालवीत असलेल्या मोफत शिकवणी वर्ग घटक चाचणीतील 8 गुणवंत विद्यार्थ्यांना वाचाल तर वाचाल वाचनालयातर्फे शालेय साहित्य (कंपास) देऊन सत्कार करण्यात आला. व संतश्रेष्ठ गाडगेबाबांच्या जीवनावर अस्खलित भाषण करणाऱ्या जयंत विद्यागर, आकांक्षा वाघमारे, अनन्या वाघमारे, भारती जाधव व पियुष वारे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाचनालयातर्फे गाडगेबाबा आणि बाबासाहेब, वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मूलन, भारतीयांचा राष्ट्रधर्म, भाषण कसे करावे व प्रिय युवानो.‌‌.. ही पुस्तके भेट देण्यात आली. वाचन संस्कृती चळवळ वाढविण्याकरता फिरते मोफत वाचण्याला तर्फे 7 व्या फेरीतील 44 पुस्तकाचा संच मुलांना व पालकांना वाचण्याकरिता शिक्षिका विशाखा वाघमारे यांना अध्यक्षांच्या हास्ते सुपुर्त करण्यात आला. पुस्तक वितरणाची जबाबदारी त्यांनी स्वयंस्पृतपणे स्वीकारली. 
     विद्यार्थ्याची व पालकाशी हितगुज साधताना प्रशांत वासनिक यांनी सोप्या भाषेत प्रश्नोत्तराच्या स्वरूपात संत गाडगेबाबांचे विचार व त्यानुसार कृती कशी करावी हे समजावून सांगितले तर ज्या इमारतीचा पाया पक्का असतो ती जास्त काळ टिकून राहते म्हणून लहानपणीच अभ्यासात सातत्य ठेवून आपल्या शिक्षणाचा पाया पक्का करावा हे अनेक उदाहरणाद्वारे यु. एस. वाघमारे यांनी समजावून सांगितले. तर अर्जुन जौंजाळ यांनी संत गाडगेबाबा व बाबासाहेब यांच्या जीवनातील विचाराचे साम्य व त्यांनी केलेल्या महान कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
      कार्यक्रमास आयु. के. एस. वाघमारे, बी. डी. तांगडे, डी.एम. राऊत व परिसरातील बहुसंख्य पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सरणयतयाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी