मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील ट्रेनी शिक्षिकेची निवड नियमबाह्य ; योग्य उमेदवार निवडीसाठी धरणे आंदोलन
बीड:- ( दि.२१) बीड तालुक्यातील च-हाटा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत ट्रेनी शिक्षिकेची निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने शासनाचे नियम डावलून केली आहे. संबंधित प्रकरणात गटशिक्षणाधिकारी यांनी लेखी आदेश देऊनही नियुक्ती न दिल्याने श्रीमती पिंगळे निकिता बाळु यांचे नातेवाईक आणि सहकारी यांनी काल दि.२० शुक्रवार रोजी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले होते. शिक्षणाधिकारी यांनी संबंधित आंदोलन प्रकरणी गटशिक्षणाधिकारी बीड यांना लेखी आदेश देऊनही दुपारपर्यंत कोणीही आंदोलनाची दखल घेतली नाही.आंदोलनकर्ते यांच्या विनंतीवरून सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन भगवान फुलारी ,शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) जिल्हा परिषद बीड यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर विस्तार अधिकारी उत्तमराव पवार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन संपूर्ण चौकशी करून मंगळवार पर्यंत अहवाल देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मुख्याध्यापिका परदेशी यांनी नियमबाह्य निवड केली असुन त्यांच्यावर कारवाई करून मला न्याय द्यावा :- पिडीत ट्रेनी शिक्षिका निकिता पिंगळे
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा च-हाटा येथे मुख्याध्यापिका परदेशी यांनी मला डावलुन नियमबाह्यपणे ईतर उमेदवाराची निवड केली.संबधित प्रकरणी गटशिक्षणाधिकारी खान यांना तक्रार केल्यानंतर त्यांनी चौकशी करून माझी शैक्षणिक पात्रता डीएड व एमएससीआयटी कागदपत्रे पाहुन माझी नियुक्ती करण्याचे आदेश देऊनही मुख्याध्यापिका परदेशी यांनी नियुक्ती केली नाही.शासनाच्या आदेशाप्रमाणे इन कॅमेरा निवड केली नाही तसेच उमेदवारांना एमएससीआयटी बंधनकारक असतानाही नियम डावलून ईतर उमेदवारांला नियुक्ती दिली. प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन मला न्याय द्यावा अशी मागणी पिडीता निकिता पिंगळे यांनी सांगितले.
न्याय न मिळाल्यास शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास बसणार :- संदिप उबाळे
गटशिक्षणाधिकारी खान यांनी निकिता पिंगळे यांची बीड.डीएड.,एमएससीआयटी हि शैक्षणिक पात्रता पाहुन नियुक्ती करण्याचे लेखी आदेश मुख्याध्यापिका परदेशी यांना दिले.परंतु त्यांचे आदेश न पाळता परदेशी यांनी बीएससी असलेल्या व एमएससीआयटी पात्रता नसणा-या उमेदवाराची नियुक्ती करत शासकीय आदेशाचे उल्लंघन केले आहे.संबधित प्रकरणात मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्यात यावी आणि योग्य उमेदवाराची निवड करण्यात यावी यासाठी धरणे आंदोलन सुरू केले होते. दुपारपर्यंत शासनाचा प्रतिनिधी आंदोलन स्थळी न आल्याने आम्ही डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना बोलावून घेतले. त्यांनी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) जिल्हा परिषद बीड भगवान फुलारी यांच्याशी फोनवरून संवाद साधल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी उत्तमराव पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मंगळवार पर्यंत चौकशी अहवाल देऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मंगळवार पर्यंत दोषींवर कारवाई न झाल्यास शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलनात आंदोलन करण्यात येईल. यावेळी आंदोलनात युनुस शेख,सुदाम तांदळे,संदिप उबाळे, मनोज उबाळे, बलभीम उबाळे, रमेश उबाळे, रणजित उबाळे, विलास उबाळे, राजेश उबाळे, विनोद उबाळे सहभागी होते.
बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत नियुक्ती मध्ये स्थानिक पुढाऱ्यांचा मनमानी कारभार:- डॉ.गणेश ढवळे
महाराष्ट्र राज्य युती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवुन ट्रेनी शिक्षक , पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, आरोग्य विभाग अशा अनेक शासकीय व संस्थेच्या जागेवर सहा महिन्यांकरीता काम करण्याची संधी दिली.परंतु बहुतांश ठिकाणी स्थानिक पुढाऱ्यांनी जवळच्या लोकांच्या नियुक्ती साठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून शासकीय आदेश डावलून मनमानी कारभार केल्यामुळे ख-या शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे. असे मत डॉ.गणेश ढवळे यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment