महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्रपाली साबळे उत्कृष्ट अभिनयासाठी सन्मानित
बीड प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या वतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाने पार पडली,राज्य नाट्य स्पर्धेत बीड व संभाजी नगर केंद्रावर बीड जिल्हा ,धाराशिव जिल्हा ,जालना जिल्हा आणि संभाजी नगर जिल्हा मिळून असे एक केंद्रात साधरील स्पर्धा दिनांक २५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर क्या दरम्यान अतिशय आनंदी व जल्लोषात पार पडली आहे .सदरील स्पर्धेत चार जिल्ह्यातून एकूण सोळा नाटके सादर झाली आहेत ,त्यात बीड येथील न्यू प्रगती महिला सेवा भावी संस्था च्या वतीने डॉ. आरुण जऱ्हाड लिखित व प्राध्यापक विनोद दळवी दिग्दर्शित द अँनॉमली हे नाटक सादर करण्यात आले होते
सदरील नाटकाने रसिक मायबाप प्रेक्षकाची मने जिंकल्या मुळे रसिक प्रेक्षकांनी नाटकास टाळ्यांच्या गजरात नाट्य गृहातील सर्व प्रेक्षक नाटकाशी एकरूप होऊन नाटकातील कलाकारांच्या सादरीकरणाला दाद देत होते. सदरील नाटकात आम्रपाली साबळे यांनी सुचिता नावाची आईची भूमिका साकारली होती,आम्रपाली यांनी रंगमंचावर सुचिता ची भूमिका साकारत असताना प्रेक्षा गृहातील प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते व टाळ्यांचा गजर नाट्य गृहात दुमदुमला होता ,त्यामुळे आम्रपाली साबळे यांना ६३ वी हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील उत्कृष्ट अभिनयासाठी विशेष गुणवत्ता प्रमाण पात्र देवून सन्मानित करण्यात आलं.
सदरील नाटकाचे लेखन डॉ. आरुण जऱ्हाड यांनी केले असून नाटकाचे दिग्दर्शन विनोद दळवी यांनी केलेले आहे.
या नाटकात सोनल टाक यांनी नर्स १ ची भूमिका तर दादासाहेब नवघरे यांनी डॉक्टर ची भूमिका सावन गिल यांनी सुधीर , आई - सुनीता नागरगोजे ,बाबा- श्याम टल्ले, बाल कलाकार बेबी एक च्या भूमिकेत कुमारी प्रांजल टाक, बेबी दोन - कुं. श्वेता औसरमोल,बेबी तीन कुमारी कीर्ती शिंदे, जावई - निखिल इच्के, सासू - हिरे मॅडम , सलमान - आमोल गायकवाड, इम्रान - आशोक घुळे, महिला पोलिस - सारिका गायकवाड, इन्स्पेक्टर - राजेंद्र जोसेफ यांनी उत्कृष भूमिका साकारून बीड च्या नाट्य प्रेमी रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
सदरील नाटकाची तांत्रिक बाजू मधे नाटकासाठी चें संगीत संयोजन राहुल साळवे आणि चिरंजीव सत्यम दळवी यांनी पाहिले तर प्रकाश योजना अशोक घोलप यांनी केली ,रंगभूषा ॲड. वर्षा वेशभूषा ॲड मनीषा दळवी , नाटकाचे दृशबंध रितेश यादव आणि आदित्य दोडके यांनी केले.या नाटकाचे सूत्रधार बाबासाहेब सोनवणे व सचिन साबळे यांनी काम पाहिले. तर पत्रकार जितेंद्र शिरसाठ यांचे मोलाचे मार्गदर्शन नाटकासाठी झाले ,आम्रपाली साबळे यांना अभिनयाचे विशेष प्रमाणपत्र मिळाल्यामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मुख्य सचिव श्री विकास खरगे साहेब, आखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्ष , बाल रंगभूमी मध्यवरती संघटनेच्या उपाध्यक्ष तथा साहित्य परिषदेच्या डॉक्टर दीपा ताई क्षीरसागर , अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे जिल्हा वेवस्थापक प्रमोद रामदासी तसेच नाटकाचे लेखक डॉक्टर आरूण जऱ्हाड,नाट्य लेखक दिग्दर्शक विनोद डावरे व द अँनोमाली नाटकाचे दिग्दर्शक प्रा.विनोद दळवी व बीड जिल्ह्यातील सर्व नाट्यकर्मी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
Comments
Post a Comment