मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील ट्रेनी शिक्षक सह सर्व प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी रुजू करावे.


 गेवराई प्रतिनिधी÷महाराष्ट्र राज्य महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवून ट्रेनी शिक्षक, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, आरोग्य विभाग अश्या अनेक जागेवर शासकीय व संस्थेच्या जागेवर सहा महिने करीता त्यांना काम करण्याची संधी दिली, येत्या दोन महिन्यांत त्यांचा कालावधी संपणार आहे, काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक-युवतीचा कालावधी वाढवून त्यांना कायमस्वरूपी आहे त्या जागेवर रूजू करावे अशी मागणी सर्व ट्रेनी शिक्षकांच्या वतीने अलीम सय्यद, नितिन आगम, सोपान संत, गणेश काशीद, महेश काकडे, विकास मगर,राठोड सर यांनी केली.

या संदर्भात नागपूर येथे आमदार अंबादास दानवे, आमदार नितिन राऊत, आमदार रोहित पवार,आमदार कैलास पाटील, आमदार राजू नवघरे, आमदार मोनिकाताई राजले, आमदार मुफ्ती इस्माईल, आमदार प्रवीण स्वामी सह अनेक आमदारांना निवेदनात नमूद केले आहे की, सर्व प्रशिक्षणर्थींना कायमस्वरूपी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. त्या अनुषंगाने निवेदनात नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्या वेतन द्यावे, युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना किमान महिन्याचे वेतन 25 हजार वेतन द्यावे. कायम करूनही दप्तर दिरंगाई मुळेच विद्या वेतन मिळत नसेल, तेव्हा दिरंगाई करणाऱ्यावर योग्य कारवाई करावी. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना आहे त्या जागेवर कायमस्वरूपी रुजू करावे अशी मागणी नितिन आगम, अलीम सय्यद, सोपान संत, गणेश काशीद, विकास मगर, राठोड सर यांनी केली.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी