बीडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरअडीच हजार नवीन पथदिवे बसवावेत
बीडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अडीच हजार नवीन पथदिवे बसवावेत बीड न.प.च्या भाजप गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी बीड (प्रतिनिधी ) दि.१ : आगामी गणेशोत्सवासह सणांच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात नगरपरिषदेने तातडीने २५०० नवीन पथदिवे खरेदी करावेत आणि गणेशोत्सव मंडळे असलेल्या प्रमुख मार्गांवर व चौकांमध्ये हे पथदिवे तातडीने बसवून ते कार्यान्वित करावेत, अशी मागणी भाजपच्या बीड नगरपरिषदेच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांनी मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्याकडे मंगळवारी (दि.१) केली आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, बीड शहराचा विस्तार झपाट्याने होत असून सध्या अनेक प्रमुख रस्ते व कॉलनी भागातील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहेत. यामुळे नागरिकांना व विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शहरात ज्या खांबांवर दिवे बंद आहेत ते त्वरित सुरू करणे आणि ज्या ठिकाणी अद्याप दिवेच नाहीत, अशा ठिकाणी सुमारे ५ हजार नवीन पथदिव्यांची गरज आहे. लवकरच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ...