परळी विधानसभा मतदारसंघात प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध; ४०,२६० मतदारांची नावे वगळली
परळी विधानसभा मतदारसंघात प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध; ४०,२६० मतदारांची नावे वगळली
परळी:
भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २३३ परळी विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदारयादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष पुनरीक्षण कार्यक्रमामुळे (SIR) मतदारसंघातील मतदार संख्येत आणि मतदान केंद्रांमध्ये मोठा बदल झाला आहे.
एकूण ४०,२६० मतदार कमी
विशेष पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी परळी मतदारसंघात ३,२७,३४४ मतदार होते. पुनरीक्षणादरम्यान खालील कारणांमुळे एकूण ४०,२६० मतदार कमी झाले असून सध्या प्रारूप यादीनुसार मतदार संख्या २,८७,१०१ इतकी झाली आहे:
- मयत व्यक्ती: ८,०८३
- कायमस्वरूपी स्थलांतरित: २१,१७२
- दुबार मतदार: ५,१३३
- अनुपस्थित मतदार: ५,७८९
- इतर: ८३
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण
पूर्वी मतदारसंघात एकूण ३६३ मतदान केंद्रे होती. सुसूत्रीकरणाअंतर्गत क्रमांक २९, १२९, १३१, १३७, १३८, १४८, १५५, १७५, १८८, ३५१ आणि ३५९ ही ११ केंद्रे कमी करण्यात आली आहेत. तसेच २३३ मतदान केंद्रामध्ये १ नवीन केंद्र तयार करण्यात आले असून, आता मतदारसंघात एकूण ३५३ मतदान केंद्रे झाली आहेत.
दावे, हरकती आणि नाव नोंदणीची संधी
- ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६: या कालावधीत नागरिकांना मतदारयादीवर दावे व हरकती नोंदवता येतील, नवीन नाव नोंदणी करता येईल तसेच नावात दुरुस्ती करता येईल
- ३१ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑक्टोबर २०२६: या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणी व निर्णयासाठी निवडणूक आयोगाने १५ सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
नागरिकांनी प्रारूप मतदारयादीत आपले नाव आहे किंवा नाही, हे आपल्या नजीकच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे (BLO) तपासावे किंवा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर (Website) पहावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, परळी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment