लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवतकथा सप्ताहास प्रारंभ
लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवतकथा सप्ताहास प्रारंभ पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; पंचक्रोशीतील महानुभाव भाविकांची उपस्थिती लिंबागणेश : (दि.२९ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक महोत्सवानिमित्त आयोजित संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या (दशम स्कंध) सोहळ्यास आज शनिवार, दि. २९ रोजी उत्साहात प्रारंभ झाला. पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. धार्मिक विधीनुसार श्रीदत्तात्रेय व लक्ष्मीनारायणाची पूजा करण्यात आली. यावेळी चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर दत्तात्रेय महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. धूप, दीप, फुले व नैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली. सप्ताहभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पारायण, दुपारी उटी-उपहार, सायंकाळी आरती व प्रवचन, तर रात्री संगीतमय भागवतकथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड येथील भागवताचार्य प.पू. महंत श्री ओंकार व्यास बाबा शास्त्र...