मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना ₹५ लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ द्या — रामधन जमाले
मयत ऊसतोड कामगारांच्या वारसांना ₹५ लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ द्या — रामधन जमाले बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या पात्र ऊसतोड कामगारांच्या वारसांना शासन निर्णयानुसार देय असलेले ₹५ लाखांचे सानुग्रह अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) बीड जिल्हाध्यक्ष रामधन जमाले यांनी मा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार हा साखर उद्योगाचा महत्त्वाचा आधार असून, ऊसतोडणी व वाहतूक करताना अपघात, सर्पदंश, विजेचा धक्का, रस्ते अपघात तसेच अन्य दुर्घटनांमध्ये अनेक कामगारांचा मृत्यू होतो. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नी, मुले, आई-वडील व इतर वारसांवर मोठे आर्थिक संकट कोसळते. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेले सानुग्रह अनुदान या कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार पात्र...