श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती मंदिरात वीणा उभारण्यात आला
श्रावण मासानिमित्त श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती मंदिरात वीणा उभारण्यात आला
लिंबागणेश येथील विविध मंदिरांची स्वच्छता; भाविक, वारकरी आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
बीड :( दि.१३) : श्रावण महिना हा अध्यात्म, मनःशुद्धी, पावित्र्य आणि व्रतवैकल्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. ऊन-पावसाचा लपंडाव, हिरवाईचा सडा आणि धार्मिक परंपरांनी नटलेला श्रावण महिना गुरुवार, दि. १३ ऑगस्टपासून सुरू झाला असून, १५ सप्टेंबरपर्यंत त्याची पर्वणी अनुभवता येणार आहे. सण-उत्सव आणि धार्मिक विधींची रेलचेल सुरू झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रावण महिन्याच्या निमित्ताने बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती मंदिर, हनुमान मंदिर, खंडोबा मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उपक्रमात भाविक, वारकरी आणि तरुण मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमात ह .भ.प. अनंतकाका मुळे, दशमे महाराज,चिंतामण जोशी, कल्याण वाणी, राजेभाऊ गिरे, श्रीकांत जोशी, शिवाजी वाणी, बाळकृष्ण मुळे, बाळकृष्ण थोरात, दगडु कांबळे,भगवान मोरे, गणपत दाभाडे,मोहन कोटुळे, बाबुराव वाणी,पांडुरंग वाणी, विनायक मोरे,वरद जोशी, अभिजित गायकवाड, सूरज भोसले, अक्षय आबदार, रोहित भोसले, कमलाकर जाधव, सचिन भोसले, विवेक भोसले, चेतन कानिटकर, सर्पमित्र अशोक जाधव,संतोष भोसले, अर्जुन घोलप, हरिओम क्षीरसागर आणि डॉ. गणेश ढवळे आदी सहभागी झाले होते.
परंपरेनुसार भालचंद्र गणपती मंदिरात वीणा उभारण्यात आला
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र भालचंद्र गणपती मंदिरात पारंपरिक पद्धतीने वीणा उभारण्यात आली. भजनी मंडळी आणि भाविकांच्या उपस्थितीत गणपती पूजन, नवग्रह पूजन आणि ग्रंथराज पूजन करून हा धार्मिक विधी पार पडला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त, पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment