जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांचा कायापालट; अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांचा कायापालट; अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम 

 बीड जिल्ह्यातील ११५ शाळांमध्ये 'समग्र शिक्षा अभियान 'अंतर्गत कामांना वेग; विद्यार्थी आणि विशेषतः विद्यार्थिनींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार :- डॉ.गणेश ढवळे 
बीड:-( दि.१३) : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील स्वच्छतागृहांचा कायापालट करण्यासाठी जितिन रहेमान सीईओ जिल्हा परिषद बीड यांनी ' समग्र शिक्षा अभियान' योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अत्याधुनिक सर्व सोयींनी युक्त स्वच्छतागृहे उभारण्याची मोहीम हाती घेतली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना दर्जेदार आरोग्य व स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि शाळांमधील गळतीचे प्रमाण कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

बीड जिल्ह्यातील ११५ शाळांमध्ये अत्याधुनिक स्वच्छतागृहांची उभारणी सुरू असल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता सुरेश बाहेगव्हाणकर यांनी दिली.

ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालयांचा अभाव असून काही ठिकाणी असलेली स्वच्छतागृहे वापरण्यायोग्य नसल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमार्फत १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात आलेली 'हमारा शौचालय, हमारा भविष्य' ही मोहीम कागदोपत्रीच राबविण्यात आल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे यांनी सहकाऱ्यांसह जिल्हा परिषद कार्यालयातील स्वच्छतागृहाची स्वच्छता करून गांधीगिरी आंदोलन केले होते.

आता ग्रामीण भागातील शाळांमधील स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त करत डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांचे आभार मानले आहेत. सर्वंच शाळांमध्ये अशाप्रकारे उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

स्वच्छतागृहाअभावी घरी जावे लागायचं :- स्वरा वाणी ( विद्यार्थीनी वर्ग ४ थी)


शाळेतील स्वच्छतागृहे वापरण्यायोग्य नसल्याने शौचालयासाठी आम्हाला शिक्षकांना विचारून घरी जावे लागत असायचं परंतु आता शाळेत सोय झाल्याने ही अडचण दूर होणार असल्याचे इयत्ता ४ थी तील विद्यार्थीनी स्वरा वाणी हिने सांगितले.



अत्याधुनिक स्वच्छतागृहांची वैशिष्ट्ये :

आधुनिक कमोड आणि वॉश बेसिन

जलजीवन मिशनद्वारे २४ तास पाणीपुरवठा

दुर्गंधी रोखण्यासाठी अत्याधुनिक एक्झॉस्ट फॅन

लिक्विड हँडवॉश, आरसा, टॉवेल आणि सॅनिटायझरची कायमस्वरूपी सुविधा



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी