चिखल बीड व्यवस्थेस जबाबदार नगरपरिषद प्रशासना विरोधात "लाॅलीपाॅप आंदोलन "
चिखल बीड व्यवस्थेस जबाबदार नगरपरिषद प्रशासना विरोधात "लाॅलीपाॅप आंदोलन "; शालेय विद्यार्थ्यांना चिखल तुडवत प्रवास:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर बीड शहरातील शाळेकडे जाणारे बहुतांश रस्ते पावसाळ्यात चिखलमय असल्याने चिखलात पायातील चप्पल,बुट फसत असुन अपघात होऊन जखमी होऊ शकतात,विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत असून लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष व नगरपरिषद प्रशासनातील आधिका-यांच्या ढिसाळ नियोजनाच्या धोरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली बशीरगंज चौकात बीड नगरपरिषद कार्यालयासमोर रस्ता,वीज , पाणी आदि. मुलभुत सुविधा न देताच केवळ आश्वासने देऊन बीडकरांची दिशाभूल व फसवणूक केल्याच्या निषेधार्थ "लाॅलीपाॅप आंदोलन "करण्यात येऊन घोषणाबाजी करत बशीरगंज चौक ते मुख्याधिकारी नगरपरिषद बीड कार्यालय रॅली काढण्यात आली. बीड जिल्हाध्यक्ष बाल हक्क संरक्षण संघ, शेख युनुस च-हाटकर, पाटोदा तालुकाध्यक्ष सतिश गर्जे, पाटोदा तालुका सचिव हमीदखान पठाण ,सामाजिक कार्यकर्ते सय्यद आबेद,शे...