ओबीसी फाउंडेशन च्या वतीने आढावा बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
बीड प्रतिनिधी:- आज रोजी शासकीय विश्रामगृह बीड येथे राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन च्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली यावेळी विविध पदावर नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर त्याच बरोबर आढावा बैठक ही संपन्न झाली यावेळी जिल्ह्याच्या विविध भागातून पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य प्रवक्ते द्वारकादास फटाले हे होते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये सर्वप्रथम राज्य उपाध्यक्ष लताताई बुंदेले जिल्हाध्यक्ष संग्राम नागरगोजे आदींचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास स्वातीताई आघाव बीड जिल्हाध्यक्ष रोहिणी ताई बांगर बीड जिल्हा उपाध्यक्ष रूपाली मिरदुडकर राणी सानप आधी पदाधिकारी उपस्थित होते या सत्कारानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यावर भर दिला
Comments
Post a Comment