सर्व कैद्यांना खाट, गादी, उशी देणे शक्य नाही!
माजी आमदार रमेश कदमांचा अर्ज फेटाळला.
मुंबई युसूफ पठाण :-कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे अपवादात्मक प्रकरणे वगळता प्रत्येक कैद्याला खाट,गादी आणि उशी उपलब्ध करणे शक्य नाही, अशी टिप्पणी अटकेत असलेले माजी आमदार रमेश कदम यांचा अर्ज फेटाळताना मे.विशेष न्यायालयाने केली आहे.
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेले माजी आमदार रमेश कदम ठाणे कारागृहात आहेत.२०१८ पासून पाठीचा त्रास आहे. जमिनीवर झोपल्याने अंगदुखीचा त्रासही होत असल्याचा दावा करून त्यांनी खाट, गादी आणि उशी उपलब्ध करण्याची मागणी केली होती.
कारागृह प्रशासनाने मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कदम यांच्या आरोग्याबाबतचा अहवालही सादर केला होता. त्यात कदम यांना खाट, गादी आणि उशीची गरज नसल्याचे म्हटले होते. याशिवाय कारागृहाची क्षमता १ हजार १०५ कैद्यांची असताना सध्या ४ हजार ५५३ कैद्यांना ठेवण्यात आल्याचेही अहवालात म्हटले होते.
Comments
Post a Comment