पायतळवाडी येथील शुभम मल्टी सर्विसेस पिक विमा उतरण्यात रेकॉर्ड ब्रेक - गंगाधर गडदे
बालासाहेब गलांडे यांनी शेतकऱ्यांना अहोरात्र पिक विमा भरण्यास केली मदत
बीड प्रतिनिधी:- माजलगाव तालुक्यातील पायतळवाडी या गावांमध्ये 900 लोकसंख्या असलेलं एक छोटस गाव, या गावांमध्ये CSC केंद्र एक असून, या गावांमध्ये एक रेकॉर्ड ब्रेक झाला आहे ,शेतकऱ्यांचे प्रमाण हे कमी असताना 400+ शेतकऱ्यांनी आप आपला पिक विमा उतरवला आहे ,शेतकऱ्यांना अशी आशा आहे मागील वर्षाच्या काळात पिक विमा येत नव्हता, मात्र यावर्षी पिक विमा येईल अशी आशा बळीराजा करत आहे, पिक विमा देण्याच्या बाबतीत बीड जिल्हा याआधी देशात अव्वल होता ,आणि यावर्षी अव्वल राहील ,अशी आशा आहे ,प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापला पिकाचा विमा उतरून घ्यावा ,आणि स्वतःला एक मदतीचा हात पुढे करून द्यावा.
शुभम मल्टी सर्विसेस च्या माध्यमातून रात्रंदिवस शेतकऱ्यांचा पिक विमा उतरवला जातो, पिक विमा उतरवण्याची तारीख 31-07-2022 आहे पिक विमा भरण्याची तारीख यावर्षी वाढण्याची कमी शक्यता आहे, त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी छोट्या मोठ्या आपापला पिक विमा उतरवून घ्यावा.
पायतळवाडी येथील शुभम मल्टी सर्व्हिसेस चे संचालक बाळासाहेब गलांडे यांनी शेतकऱ्यांसाठी अहोरात्र मेहनत करून शेतकऱ्यांसाठी पिक विमा भरण्यासाठी व रात्रभर संघर्ष केला,
Comments
Post a Comment