गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बार्टीच्या विशेष योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी-नितीन सोनवण,ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या विशेष योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. ही योजना 2021 साली जाहीर झाली होती, परंतु महाराष्ट्र शासनाने अद्याप ती कार्यान्वित केलेली नाही. सोनवणे यांनी सांगितले की, बार्टीच्या या विशेष योजनेमुळे अनुसूचित जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठा आधार मिळेल. मात्र, ही योजना बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक भवितव्य धोक्यात आहे. "ही योजना तातडीने सुरू करून सामाजिक न्यायाच्या दिशेने ठोस पाऊल उचलावे," अशी मागणी त्यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली आहे. ऑल इंडिया पॅंथर सेना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनावर दबाव आणण्यासाठी पुढील काळात आंदोलनात्मक पावले उचलण्याचा विचार करत आहे. याबाबत सोनवणे म्हणाले, "विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही कोणतीही...