जातीयवादी वसंत खेडकरची दलित महिलेस बेदम मारहाण,घटना सीसीटीव्ही मध्ये कैद-आंबेडकरी जनतेत प्रचंड संताप



बीड (प्रतिनिधी)
एका दलित महिलेस घरासमोर राहणाऱ्या रिटायर्ड फौजीने बेदम मारहाण केली असून उपचारासाठी त्या महिलेस जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असा कि, महात्मा फुलेनगर, धानोरा रोड, बीड. या ठिकानी शिक्षक असलेले अंकुश कोरडे व रिटायर्ड फौजी वसंत खेडकर हे समोरासमोर राहतात, गत दोन वर्षापासून किरकोळ कारणांवरून वसंत खेडकर हे कोरडे दाम्पत्यास जानिवपूर्वक त्रास देत आहेत, बुधवार दिनांक 30 एप्रील रोजी असेच कुठलेतरी कारण काढून खेडकर हे कोरडे यांच्या मुलांना रागावले व धमकावून प्रखरतेने जातीचा उल्लेख करून शिवीगाळ केली. त्यावरून कोरडे यांच्या मुलांनी आईस घरात जाऊन सांगितले की बाहेर समोरचे काका ओरडत आहेत. त्याबाबत घराबाहेर येवून दीक्षा अंकुश कोरडे यांनी खेडकर यांना विचारताच मी तुझ्या मुलांच्या अंगावर गाडी घालीन अशी धमकी देवून त्यांनी दिक्षा कोरडे यांचे केस पकडून त्यांचे डोके यांनी त्यांच्या गेटवर आपटले तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणत होते तुम्ही महाराचे लोक खुप माजलात तुमचा माज उतरायला मला वेळ लागणार नाही. मी आर्मीत नोकरी केली आहे तुम्हा महारगाडयांना संपवायला मला वेळ लागणार नाही, तुम्ही आमची बराबरी करता काय अस बरच काही ते बोलत होते त्यावेळी त्यांची पत्नी पुष्पा खेडकर हिनेसुद्धा दिक्षा कोरडे यांना मारहाण केली आणि वसंत खेडकर यांनी दिक्षा यांना लज्जा वाटेल अशा ठिकानी त्यांना स्पर्श करून त्यांचा जानिवपुर्वक विनयभंग केला. यावेळी कोरडे यांची लहान मुले आईची सुटका करण्याबाबत केविलवाण्या आवाजाने ओरडत होती, या नराधमाने या बालकांनाही उचलून फेकून कोरडे यांच्या मुलीला मारहाण केली. हा सर्व प्रकार घरी घडत असताना अंकुश कोरडे हे घरी नव्हते.

   शिवाजी नगर पोलीस ठाण्यात विनयभंगासह भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमाने आणि ॲक्ट्रॉसिटी अधिनियमाने वसंत खेडकर व इतरा विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत. काल रुग्णालयात जावून अनेक पक्ष संघटनांच्या नेत्यांनी जखमी दिक्षा अंकुश कोरडे यांची भेट घेवून त्यांना धिर दिला आहे. आणि घटणेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सदरील गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून अन्यायग्रस्त महिलास न्याय द्यावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी