बीड या ठिकाणी मध्यरात्री बसवला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा.
स्वप्निल वरपे या तरुणाने स्वखर्चाने बसवला पुतळा, शिवप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण,
बीड प्रतिनिधी अंकुश गवळी
बीड शहरातील महालक्ष्मी चौक परिसरात रामनगर या ठिकाणच्या भागांमध्ये बीड येथील सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व स्वप्निल वरपे या तरुण कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा मध्यरात्री पुतळा बसवला, गेल्या अनेक वर्षापासून हा रखडलेला प्रश्न एकंदरीत पाठपुरावा स्थानिक आमदार लोकप्रतिनिधीला ते जमले नाही ते एका तरुण कार्यकर्त्यांनी करून दाखवला आहे, त्यांच्या सहकारी मित्रा बरोबर रात्रीच्या दरम्यामध्ये तीन वाजण्याच्या सुमारास पुतळा बसवण्यात आला ,यामध्ये काही शिव प्रेमींना अटक करण्यात आली आहे, छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे, एकंदरीतच बीड जिल्ह्यामध्ये शिवप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे,
Comments
Post a Comment