छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अंजनवती येथे अभिवादन कार्यक्रम


बीड प्रतिनिधी:-अंजनवती, ता. १४ मे २०२५: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज अंजनवती (ता.जि.बीड) येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. 

या कार्यक्रमात गावकऱ्यांसह मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली.
या प्रसंगी नितीन सोनवणे महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया पॅंथर सेना बीड.बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती-भिमशक्ती विचार मंच), अशोक येडे पाटील (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, बीड), कैलास येडे पाटील (सरपंच, अंजनवती) यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि त्यागाचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमात गावकऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. हा कार्यक्रम गावातील एकता आणि इतिहासाप्रती आदराचे प्रतीक ठरला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी