मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या कार्यकाळात नगरपालिकेत अंधारच अंधार !पाण्यासाठी शहरातील नागरिकांना भटकंती करण्याची वेळ - वर्षाताई जगदाळे
बीड प्रतिनिधी - शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी असणाऱ्या बीड नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी नेता अंधारे यांनी तुघलकी कारभार सुरू केला आहे का? शहरातील नागरिकांना 25 दिवसाला पिण्याचे पाणी येत नसल्याने याचा जाब विचारण्यासाठी नगरपालिकेत गेलेल्या मनसेच्या राज्य उपाध्यक्ष वर्षा जगदाळे यांना आपली जबाबदारी पाण्याची नसल्याचे सांगत हात वर करणाऱ्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांची तात्काळ बीड मधून निलंबित करत हकलपट्टी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे वर्षाताई जगदाळे यांनी म्हटले असून बीड नगरपालिकेचा कारभार नीता अंधारे यांच्या कार्यकाळात दयनीय झाला आहे. शहरात साचलेले कचऱ्याचे ढीगारे पसरलेली रोगराई रात्रीच्या वेळी मुख्य ठिकाणी असलेले पथदिवे बंद यासह शहरात मोकाट जनावरांचा वावर तुंबलेल्या नाल्या यासह शहरातील नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळत नसल्याने शहरात पाणी बानी असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वर्षाताई जगदाळे यांच्या सह मनसेचे शिष्टमंडळ कधीही हजर नसलेल्या नीता अंधारे यांच्या भेटीसाठी गेले असता तब्बल 114 कोटी रुपयांची जलजीवन योजना जल जीवन विभागाकडे देण्यात आली असल्याचे म्हणत आपली जबाबदारी फक्त पाणी सोडण्याची आहे. या पलीकडे आम्ही काही करू शकत नाही पाणी न आल्यास आम्ही काहीच करू शकत नसल्याचे सांगत तुम्हाला लेखी स्वरूपात देते असल्याची उर्मट भाषा मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी वापरली. नीता अंधारे यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या आहेत मात्र मुख्याधिकाऱ्यांचे लाड कशामुळे पुरवले जात आहेत निष्क्रिय व भ्रष्टाचारी असलेल्या नीता अंधेरीची बदली करण्यासाठी नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे जाऊन भेट घेणार असल्याचे मनसेच्या वर्षाताई जगदाळे यांनी म्हटले आहे. बीड नगरपालिकेला आलेला कर व नळपट्टी घरपट्टी बांधकाम बनवण्यासाठी लागणारे पैसे हे कुठे जातात. दहा कोटी रुपयांचे टेंडर जिल्हाधिकारी रद्द केले यामागे नीता अंधारे ची बुद्धी होती आता पाण्यासाठी लोकांना त्रास देणाऱ्या या मुख्यअधिकारी नीता अंधारे यांना बीड शहरातून निलंबित करत अकलपट्टी करण्याची मागणी वर्षाताई जगदाळे यांनी केली असून. मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या विरोधात नगरपालिकेत पुन्हा बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचे वर्षाताई जगदाळे यांनी म्हटले आहे. वर्षाताई जगदाळे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष आशाताई कुटे तथा शहराध्यक्ष अमरजान पठाण आदी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment