जिल्ह्यात १ हजार ९६५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित,बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी - मनोज जाधव

जिल्ह्यात १ हजार ९६५ विद्यार्थ्यांचे आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित

बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी - मनोज जाधव 
बीड (प्रतिनिधी) शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी शाळांतील २५ टक्के राखीव मोफत जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील तिसऱ्या फेरीतील प्रवेशाची मुदत अखेर दि.७ मे रोजी संपुष्टात येणार आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १ हजार ९६५ विद्यार्थ्यांचे आरटीईद्वारे प्रवेश निश्चित झाले आहेत. अशी माहिती शिवसंग्रामचे युवा नेते दत्ता आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे.

     आरटीई प्रवेशासाठी यंदा जिल्ह्यात २१४ शाळांमध्ये २ हजार २३५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ५ हजार ७८१ अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी काढलेल्या सोडतीद्वारे २ हजार १८३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर ६ मे पर्यंत १ हजार ९६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी साधारण चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. आता चौथी फेरी ही अंतिम असणार असून यात प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे.


बोगस प्रवेश रोखण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी - मनोज जाधव 

आरटीई अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी अनेक पालकांनी खोटी कागदपत्रे तयार करत मोफत प्रवेशांचा लाभ मिळवला आहे. या संदर्भात सक्षम पुरावे आढळले असून रीतसर लेखी तक्रार जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी कार्यालयास आपण दि. २७ फेब्रुवारी रोजी दिली होती या अनुषंगाने शिक्षणाधिकारी यांनी २८ फेब्रुवारी रोजी सदर तक्रारीच्या संदर्भाने गटशिक्षणाधिकारी यांना सखोल चौकशी करून आणि पडताळणी करून एकही बोगस प्रवेश होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि लेखी अहवाल कार्यालयास सादर करावा असे निर्देश दिले होते. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने ७ मार्च रोजी त्री सदस्य चौकशी समिती नेमत चौकशीचे आदेश दिले मात्र या चौकशी समितीला कितपत बोगस प्रवेश रोखण्यात यश आले आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून फक्त कागदी घोडे नाचवत बोगस प्रवेशाला एक प्रकारे खतपाणी घालण्याचे काम केले जात आहे. तेव्हा झालेल्या बोगस प्रवेशा संदर्भात उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात यावी अशी मागणी आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे.

असे झाले प्रवेश

मुख्य निवड फेरी - १५७८ प्रवेश

प्रतीक्षा फेरी क्र. १ - २२४ प्रवेश

प्रतीक्षा फेरी क्र.२- १३४ प्रवेश

प्रतीक्षा फेरी क्र. ३ - २९ प्रवेश

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी