पांढऱ्या धोट रंडक्या माथ्याचा आत्महत्याकरी पुत्र, संघर्षमय जीवनात नुसता अंधार....!


       काल परवा एक रुग्ण म्हतारी माझ्याकडे आली, अतिशय हताश होती, दुःखी होती, तीच स्वतःच्या देहावरील भान विसरल होत पदर खाली पडलेला, पांढरे मोकळे केस सोडून दुःखी मनाने ती आली,अतिशय खिन्न उदास आणि काहीतरी चिंतेत असलेली ही माता पाहून आपसूकच मी त्यांना विचारले काय झालं आई? त्या अतिशय हळू आवाजात म्हणाल्या काय सांगावं दैवाचा खेळ न्यारा, तुम्हाला तरी काय सांगावं? अन काय ठुवावं? मलाच कळनं काय झालं अन काय नाही? आता तुम्हीच तपासून सांगा काय झालय मला? असा उलट सवाल करून त्या तपासनीच्या बाकावर आडव्या झाल्या. मी स्टेथो आणि बीपी मिटर घेऊन तपासले तर बीपी अगदीच कमी होता अशक्तपणा वाढला होता शरीर चिंतेन क्षीण झालं होत. मी सलाईन लावण्यासाठी लिहून दिल आणि सलाईन लावली तोवर म्हातारी दुसऱ्या पेशंट महिलेला सांगत होती. पहाडासारखा ल्योक गेला,देवाने चोरून नेला त्यानं फाशी घेतली काय कराव कळत नाही? घास नरड्याच्या खाली उतरत नाही.आठ महिने झालं,सून खायला विचारत नाही, मोल मजुरी करून पोट भरते माझं मी. हे बोलत असताना मी ऐकलं मनात प्रश्न पडला आणि कुतूहलाणे विचारानं आई लेकाने फाशी का घेतली तर तीने सांगितलं बायको भांडण करून माहेरी गेली होती म्हणून त्यानं जीव दिला ,मित्रानो आपली जिंदगी इतकी स्वस्त नका करू जी एखादी च्या नादात गमावू नका, बायको गेली झ्याट गेलं असं आपली पूर्वज म्हणायचे बायको म्हणजे जन्माच बंधन जे अतूट नातं असत पण बायको नात निभावत नसेल तर तिला सोडून द्या. बस स्टॅन्ड वर उभा आहेत असं समजा आणि गावाला जायचं म्हणून एक बस गेली म्हणून आता पोहचणार नाहीत असं नाही एक गेली दुसरी येईल घाबरू नका पण तुमचा निर्धार असला पाहिजे गावाला जाण्याचा पक्का निर्धार असणं गरजेचं आहे.नसता आत्महते सारखं वाईट पाऊल उचलून स्वतःला संपवू नका. त्या आजीने सांगितलं त्याने बायको माहेरी गेली म्हणून आत्महत्या केली. बायकोला कोनितरी निरोप दिला की त्यानं आत्महत्या केली म्हणून ती परत आली सगळा अंत्यविधी पार पडला आता मात्र असं रडत होती की तीच खूपच प्रेम होत त्याच्यावर,याचा जीव गेला दहा पंधरा दिवसात मृत्युंपत्रक तयार करून उरलेल्या संपत्ती साठी वकील लावून नावाची करून घेतली आता तीच मालकीण आहे आणि मी मोलकरीण झाले आहे.असे त्या आजीने रडत रडत सांगितले.त्या आजीला धीर दिला, शांत केल, उर दाटून आला तिचा, पोटचा गोळा गेला होता जगात तीच कोणीच नाही अशीच तिची भावना झाली होती. चार दिवस आजारी असूनही घरी पडून होती सुनेने विचारलं नाही काय झालं म्हणून? तीनच बळचं उठून आज दवाखाना गाठला. मित्रानो सांगायचं इतकंच आहे आत्महत्या हे फायनल समाधान नाही. उलट आत्महत्येने मागील लोकांचे जास्त हाल होतात त्यामुळे सगळ्यांचा विचार करून आत्महत्या सारखे घातक विचार करू नका, जन्मदात्या माता पित्याचा विचार करा. वैचारिक मतभेद असतील तर बायको सोडा वाटल तर तसंच रहा पण रहा मरू नका,शेवटी जीवन अनमोल आहे, त्याला व्यर्थ वाया घालू नका. तुम्ही गेले तर त्या माता पित्याला कोणी नाही,ना मागचा ना पुढचा, आणि त्यातही पित्याच लहानपणी छत्र हरवलेले असताना ज्या मातेने तुम्हाला तळ हाताप्रमाणे सांभाळलं त्या मातेचा उत्तराधिकारी तुम्ही असता तिची आंधळ्याची काठी तुम्ही असता तिच्या म्हातारपणाची साथ तुम्ही असता आणि म्हणून आत्महत्या करू नका फाशी घेऊ नका जीवन जस जगता येईल तस जगा पण जगासाठी जीव गमावू नका.तिच्या पांढऱ्या धोट रंडक्या माथ्याला वाट्याला आलेला संघर्ष कुठंतरी थांबवायचा असेल तर तुम्ही खंबीर झालं पाहिजे, बायका येतील जातील राहतील काहीही होईल पण आई बाप एकदाच येतात हे जीवन एकदाच येत त्याला वन्स मोर नाही आणि म्हणून आपला जीव महत्वाचा आहे तो गमावू नका इतकंच. 

लेखन-मा.सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर-9922541030

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी