पाटोद्यात संविधान दिन उत्साहात साजरा
पाटोद्यात संविधान दिन उत्साहात साजरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन; संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान संविधान सभेने स्वीकारले. या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यात आले.भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये दिली आहेत.या मूल्यांचे जतन करणे आणि संविधानाचा आदर राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करत लोकशाही, सामाजिक समता ...