शिवानी दत्तात्रय देवकते हिची (BAMS) शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय बुलढाणा येथे निवड
शिवानी दत्तात्रय देवकते हिची (BAMS) शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय बुलढाणा येथे निवड
बीडचे डीवायएसपी पांढरे साहेब यांच्याकडून सत्कार
ढेकणमोहा (प्रतिनिधी) बीड येथेल जिल्हा रुग्णालय बीड येथे कार्यरत असणारे दत्तात्रय देवकते यांची सुकन्या कु. शिवानी देवकते हिची BAMS वैद्यकीय शिक्षणासाठी शासकीय कोट्यातुन निवड झाली असुन तीला BAMS शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय जळगांव (जामोद) जि. बुलढाणा येथे वैद्यकीय शिक्षणाचे निवड झाली आहे. कु. शिवानी देवकते हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शाहुकन्या विद्यालय येथे झाले असुन उच्च माध्यमिक शिक्षण गोरक्षनाथ माहाविद्यालय ढेकणमोहा येथे झाले आहेत. या नंतर नीट परीक्षेच्या माध्यमातुन ती BAMS वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरली आहे, निवड झाल्याबद्दल बीडचे डीवायएसपी भारत पांढरे साहेब यांनी कु. शिवानी देवकते हिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला व अभिनंदन केले आहे. यावेळी नारायण देवकते ग्रा. सदस्य ढेकणमोहा, सुभाष देवकते व विनायक देवकते सर, शिवाजी देवकते पोलीस पाटील ढेकणमोहा, सत्यनारायण देवकते पोलीस, आकाश देवकते फार्मे स्ट्रक्चर बीड, आशिष देवकते, अक्षय देवकते, निखिल देवकते, कौशल्य देवकते हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment