बोरफडीच्या शाळा इमारतीसाठी डॉ. अरुण घुगे दाम्पत्याकडून १० हजार विटांचे योगदान
बोरफडीच्या शाळा इमारतीसाठी डॉ. अरुण घुगे दाम्पत्याकडून १० हजार विटांचे योगदान सरपंच कैलास घुगे यांच्या संकल्पनेतून लोकसहभागातून शाळा उभारणी; डॉ. अरुण घुगे आणि डॉ. जयश्री घुगे यांचा शैक्षणिक कार्याला हातभार बीड प्रतिनिधी :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळावे, या उद्देशाने सरपंच कैलास घुगे यांच्या संकल्पनेतून मौजे बोरफडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन वर्गखोल्यांची उभारणी लोकसहभागातून करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी गावचे भूमिपुत्र तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण घुगे आणि डॉ. जयश्री अरुण घुगे यांनी एकत्रितपणे १० हजार विटांचे योगदान दिले आहे. त्यांच्या या सहकार्यामुळे शाळेच्या बांधकामाला मोलाचा हातभार लागला असून ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींकडून त्यांच्या दातृत्वाचे कौतुक होत आहे. शाळा ही केवळ चार भिंतींची इमारत नसते, तर ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घडविणारे ज्ञानमंदिर असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मि...