महिला सुरक्षेसाठी पाटोदा पेटला!अश्लील मेसेजने संतापाचा स्फोट; महिलेच्या मोबाईल नंबरचा गैरवापर, निषेधार्थ पाटोदा बंद
महिला सुरक्षेसाठी पाटोदा पेटला! अश्लील मेसेजने संतापाचा स्फोट; महिलेच्या मोबाईल नंबरचा गैरवापर, निषेधार्थ पाटोदा बंद! कुरियरमधून नंबर मिळवून छळ केल्याची घटना; नंबर कुठून मिळाला? पोलिसांसमोर मोठा सवाल! संबंधितांचा तातडीने शोध घेण्याची मागणी पाटोदा | प्रतिनिधी महिलांच्या सुरक्षिततेला आव्हान देणारी गंभीर घटना पाटोद्यात घडली असून, एका महिलेला रात्री अश्लील भाषेत मेसेज करून तिचा छळ करण्यात आला. या संतापजनक घटनेने पाटोदा शहर हादरले असून, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरला. घटनेच्या निषेधार्थ पाटोदा शहर बंद ठेवण्यात आले. दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी एका महिलेला रात्री अश्लील स्वरूपाचे मेसेज करण्यात आले. संबंधित महिलेचा मोबाईल नंबर पार्सल अथवा कुरियर सेवेतून मिळवून त्याचा गैरवापर करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महिलेचा नंबर नेमका कुठून मिळाला? तो कोणाकडून मिळाला? आणि तिच्यापर्यंत पोहोचलेल्या या वैयक्तिक माहितीचा गैरवापर कोणी केला? हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. महिलांचा मोबाईल नंबर खासगी की कुणाच्याही वापरासाठी? ग्राहकांचा मोबाईल नंबर हा वैयक्तिक माहि...