Posts

बुद्धघोष यास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्याकडे दत्तक; बीडमध्ये प्रेरणादायी सोहळा

Image
बीड | प्रतिनिधी तथागत गौतम बुद्ध यांच्या समता, करुणा आणि प्रज्ञेच्या धम्माचा प्रसार अधिक व्यापक व गतिमान करण्याच्या उद्देशाने पाटोदा येथील जावळे कुटुंबीयांनी आपल्या बुद्धघोष या मुलास धम्मकार्यासाठी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांच्या स्वाधीन करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. हा दत्तक सोहळा मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या बीड येथील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला. भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) हे वर्षावासानिमित्त बीड येथील त्रिरत्न बुद्ध विहार येथे वास्तव्यास असून, धम्मप्रसारासाठीचा धम्मरथ देखील त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मकार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी जावळे कुटुंबीयांनी हा निर्णय घेतल्याने उपस्थितांनी त्याचे स्वागत केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे बीड तालुकाध्यक्ष राजेंद्र ससाने बीड तालुका कोषाध्यक्ष गोपीनाथ बनसोडे, सुनील जावळे तसेच बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी बुद्धघोष याला शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल धम्मप्रवासासाठी मंगलकामना व्यक्त केल्या. या प्रसंगी भदंत डॉ. सुमेधबोधी (ए) यांनी धम्माचा प्र...

भालचंद्र विद्यालयात शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

Image
भालचंद्र विद्यालयात शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार  शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाची परंपरा कायम :- – डॉ. गणेश ढवळे  लिंबागणेश :- (दि. २८ ) :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल २५ जुलै रोजी जाहीर झाला. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज मंगळवारी (दि. २८) उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. मुकुंद मोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, पत्रकार हरिओम क्षीरसागर,प्राचार्य दत्तात्रय कवडे आणि वरिष्ठ लिपिक शिवाजी जाधव उपस्थित होते. यावेळी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी कु. अंकिता कुंडलिक मांडवे, चि. श्रेयस लक्ष्मण कदम, सय्यद अल्मिन अजीम, कु. श्रुती मल्हारी ढास, कु. अनुजा दिनकर हिंदोळे,कु. स्नेहल बन्सी निर्मळ, श्री आनंद बारगजे तसेच इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेतील कु. सय्यद अलविना अजीम यांचा...

आश्रमशाळांतील संस्थाचालकांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सामाजिक न्याय भवनासमोर निदर्शने

Image
आश्रमशाळांतील संस्थाचालकांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात सामाजिक न्याय भवनासमोर निदर्शने कर्मचाऱ्यांची शारीरिक, मानसिक व आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप; उच्चस्तरीय ऑडिट, ऑनलाइन हजेरी व दोषींवर कारवाईची मागणी – डॉ. गणेश ढवळे बीड:-( दि.२७ ): बीड जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालणाऱ्या आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभार, आर्थिक गैरव्यवहार आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७ सोमवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर करण्यात आले.  जिल्ह्यातील ४५ आश्रमशाळांमध्ये सुमारे ७५० शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक व त्यांच्या कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. काही ठिकाणी अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्...

बीडमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नादवेध संगीत महोत्सव उत्साहात संपन्न

Image
बीडमध्ये पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नादवेध संगीत महोत्सव उत्साहात संपन्न  वरुणराजाच्या हजेरीने सुरांमध्ये भरला अधिकच रंग ​बीड प्रतिनिधी :महाराष्ट्राच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा.ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बीड येथील सौ. के.एस.के. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला ‘नादवेध संगीत महोत्सव’ २६ तारखेला मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. ​सौ. के.एस.के. महाविद्यालय आणि ताल साधना म्युझिक सर्कल, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने या सुरेल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान काही काळ पावसानेही हजेरी लावली. या रिमझिम पावसामुळे संगीताच्या सुरांमध्ये अधिकच आल्हाददायक रंग भरला गेला आणि रसिकांचा उत्साह द्विगुणित झाला. ​या कार्यक्रमात नामवंत आणि स्थानिक कलाकारांनी आपल्या गायन व वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय व सुगम संगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ​पावसाच्या शिडकाव्यातही बीडमधील संगीतप्रेमी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला. आयोजकांच्या उत्कृष्ट नियोज...

सोमवार च्या नियोजित ' जनक्रांती विद्यार्थी -विद्यार्थिनीं-पालकांच्या रॅली ' ऐवजी मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत 'शिक्षणा' संबंधी निवेदन देणार

Image
बीड प्रतिनिधी. : - बीड शहरातील शिक्षणप्रेमी सामाजिक-राजकिय कार्यकर्त्यांनी दिल्ली येथील जंतर मंतर वरील आंदोलनाला समर्थन व तिथे आंदोलक मुलां-मुलींना झालेली अमानुषपणे मारहाण अन् भयंकर अत्याचारांचा निषेध करण्यासाठी दि २७ जुलै,सोमवार रोजी किल्ला मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय,बीड अशी नियोजित ' रॅली ' स्थगित करुन ; त्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर' निर्धार सभा घेवून, दर्जेदार शिक्षण, पारदर्शक परीक्षा, वेळेत रास्त निकाल,शिक्षण -धोरण २०२० रद्द करणे ,'एन.टी.ए.' बरखास्त करणे,एन.टी.ए.चे चेअरमन डॉ. प्रदीपकुमार जोशी यांचे कडून वर्तमान पेपर फुटी व निकालातील घोटाळ्यांचा 'तपास' काढून घेणे व सर्वौच्च न्यायालयाचे जेष्ठतम सेवानिवृत्त न्यायमुर्तीं च्या अध्यक्षतेखाली वर्तमान व अगोदरच्या पेपरफुटी,निकालातील घोटाळे इत्यादीचा तपास करवून घेणे, आंदोलक विद्यार्थी,विद्यार्थिनी,महिला यांना ज्या पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलिसांच्या वेषात असलेले गुंड, मवाली यांचेवर गुन्हे दाखल करणे; शेकडो गुंडांना पोलीसांच्या लाठया देवून ज्या अधिका-यांने बेकायदेशीर काम केले,त्यांना निलं...

अभिजित दिपके यांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा द्या-स्नेहा वंजारे/दीपके

Image
अभिजित दिपके यांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा द्या-स्नेहा वंजारे/दीपके   जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपतींना निवेदन, दिल्ली पोलिसांवर भरोसा नाही-डॉ जितीन वंजारे     बीड प्रतिनिधी :- दिनांक 24 रोजी अभिजित दिपके यांची बहीण स्नेहा वंजारे/दिपके आणि भाऊजी डॉ जितीन वंजारे यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अभिजित दिपके यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस संरक्षण देण्याबाबत राष्ट्रपतीना निवेदन दिले. दिल्ली येथे जंतर-मंतरवर सुरू असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणामुळे बळी गेलेल्या विद्यार्थ्यांच्याविषयी संवेदना बाळगून अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून स्टॅन्ड घेतला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली याला भारतातील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देत विद्यार्थ्यांसाठी एक नवी चळवळ निर्माण केली, लाखो विद्यार्थी जंतर-मंतरवर तसेच देशभरामध्ये विविध शहरांमध्ये एकवटले आहेत पोलीस प्रशासन त्यांना अमानुष हनुमान करत आहे, लाठी चार्ज करत आहे, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, सरकार दडपशाही करत आहे आणि म्हणून अभिजीत दिपके यांनाही हानमार, लाठीचार्ज, जीवा...

थेरला जिल्हा परिषद शाळेची वर्गखोलीची भिंत मध्यरात्री कोसळली, मोठा अनर्थ टळला

Image
थेरला जिल्हा परिषद शाळेची वर्गखोलीची भिंत मध्यरात्री कोसळली; मोठा अनर्थ टळला प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निधीची मागणी : डॉ. गणेश ढवळे पाटोदा : (दि. २५ )पाटोदा तालुक्यातील तांबा राजुरी केंद्रांतर्गत थेरला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या जीर्ण झालेल्या वर्गखोलीची भिंत व छत गुरुवारी (दि. २३) मध्यरात्री कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने त्यावेळी शाळेला सुटी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळांच्या धोकादायक अवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या शाळेचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रेहमान आणि शिक्षणाधिका...