लिंबागणेश:- बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात आज दि.२३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बालासाहेब जाधव होते. संत गाडगेबाबा यांचा जीवनपट उलगडताना नाना वाणी यांनी ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे संत गाडगेबाबा यांनी अंधश्रद्धा,समाज विघातक चालीरीती यावर कडाडुन प्रहार करत आचरणातून देव दगडात नसून माणसाच्या मनात आहे.गावोगावी फिरून त्यांनी विवेकाच्या खराट्याने लोकांची मने स्वच्छ केल्याचे सांगितले. कार्यक्रमाची प्रस्तावना सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ यांनी केली तर आभारप्रदर्शन डॉ.गणेश ढवळे यांनी केले. यावेळी उपसरपंच बाळकृष्ण थोरात,राजेभाऊ गिरे, ग्रां.स. श्रीहरी निर्मळ,अर्जुन घोलप,ग्रां. कर्मचारी जीवन मुळे, सुखदेव वाणी,कचरू निर्मळ, गणपत तागड,संजय घोलप, सुरेश निर्मळ,संतोष भोसले,सुदाम मुळे,दादा गायकवाड, संतोष वाणी, , राहुल निर्मळ, संजय पावले,मनोहर वाणी आदि उपस्थित होते.