निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक



 गेवराई प्रतिनिधी गणेश भाऊ ढाकणे 7820863474

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेले 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून आज सभागृहात सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिले नाही.अशी प्रतिक्रिया बीड जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड श्रीनिवास बेदरे यांनी प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे. अँड बेदरे पुढे म्हणाले सरकारने कितीही ढोल वाजवले, उर बडवले तरी आंदोलनकर्त्यांमध्ये सरकारने फसवल्याची भावना आहे. हे या सरकारचे अपयश आहे. महायुतीचे सरकार हे फसवे सरकार आहे. हे मराठा समाजाच्या आता लक्षात आले आहे. दोन वेळा न्यायालयात न टिकलेले आरक्षण पुन्हा या महायुती सरकारने दिले आहे.आणि मनोज जरांगे पाटील यांची मूळ मागणी सगे सोयरे ला अधिवेशनात बगल देऊन केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे. तेलही नाही आणि तुपही नाही आमच्या मराठा समाज बांधवांच्या हाती या महायुती सरकारने फक्त धुपाटणे दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारने ही

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी