राष्ट्रसंत गाडगेबाबानीं स्वच्छतेतून समृद्धी चा संदेश दिला-नगरसेवक ॲड विकास जोगदंड


बीड (प्रतिनिधी) 23 फेब्रुवारी सर्व मानव एक आहेत माणसा माणसात भेदभाव करू नका, अस्पृश्यता पाळू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, सावकाराकडून कर्ज काढू नका,आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्या, आपले गाव स्वच्छ ठेवा तसेच आपल्या मनातील अनिष्ट परंपरा काढून टाका मन स्वच्छ ठेवा असा राष्ट्रसंत गाडगेबाबानीं  स्वच्छतेतून समृद्धी चा मौलिक संदेश दिला असल्याचे प्रतिपादन भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त भिम स्वराज्य सेनेच्या विभागीय कार्यालयात  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केले.
पुढे अभिवादन पर बोलताना ॲड विकास जोगदंड म्हणाले की बुद्ध,कबीर,संत तुकाराम महाराज,महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा उपदेश व तत्वज्ञान जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत बहुजन समाजातील अशिक्षित जनतेपर्यंत संत गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनाद्वारे पोहचविले,आपल्या कीर्तनातून त्यांनी वंचित उपेक्षित,शोषित,कष्टकरी, पीडित, बहुजन समाजाच्या व्यथा वेदनांना वाचा फोडत शिक्षणाशिवाय माणूस धोंडा आहे असे शिक्षणाचे महत्त्व सांगत आपल्या मुला बाळांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरां सारखे शिकवा, शिक्षणाशिवाय मानवाचा उद्धार होऊच शकत नाही,आपले गाव परिसर स्वच्छ ठेवा असे परिवर्तनवादी बोधामृत गाडगेबाबा यांनी संबंध मानवी समहुला सांगितले असल्याचे ही शेवटी विकास जोगदंड यांनी सांगितले
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नाना कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार मंगेश जोगदंड यांनी मानले
यावेळी सत्यभान जाधव,राजेश कोकाटे,महादेव वंजारे, शेख अय्युब,साहिल गायकवाड,आदर्शराजे जोगदंड, आदित्यराजे जोगदंड,लखन शिंदे, अजय जोगदंड,गोरख जोगदंड, राकेश जावळे सह आदी उपस्थित होते

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी