जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले मुली जामखेड येथे बाल आनंदी बाजाराचे व खाद्यपदार्थ वस्तूची विक्रीचे आयोजन करण्यात आले


 जामखेड (सखाराम पोहिकर ) जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुले मुली जामखेड येथे बाल आनंद बाजाराचे व खाद्यपदार्थ वस्तूचे विक्रीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी माननीय बाळासाहेब धनवे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रवचन याने झाले उद्घाटन प्रसंगी बोलताना माननीय गटशिक्षणाधिकारी धनवे साहेब म्हणाले की विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख शिक्षण मिळावे वर्गात मिळालेल्या शिक्षणाचे उपयोजन दैनंदिन जीवनात विद्यार्थ्याला करता यावे यासाठी आनंदी बाजार हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे अशा स्तुत्य उपक्रमाचे पद्धतशीर व नियोजन पूर्वक आयोजन केल्याबद्दल मराठी मुले मुली जामखेड शाळेचे भरभरून कौतुक करत समाधान व्यक्त केले आनंदी बाजारात विविध फळे फळभाज्या खेळण्याची मिठाईची खाद्यपदार्थाची दुखणे मांडून बालविक्रेते आपला मालविका व म्हणून ग्राहकांना मालाचे महत्त्व पटवून देत होते तसेच पैसे नाणी व नोटा यांचा हिशोब पटापट जुळवून देत होते प्रत्येक विद्यार्थी आनंदाने आपला मान विकत होता माननीय शिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी प्रत्येक दुकानांना भेट देऊन बाजार खरेदी केला तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाबासकी दिली त्यांच्या समावेत दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय कर्डिले सर दत्तात्रेय यादव सर व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष गिरी श्री नाशिर सय्यद श्री संतोष तवटे श्री भाऊसाहेब काळे श्री निलेश गायकवाड तसेच सर्व सदस्य उपस्थित होते आनंदे बाजारासोबत आनंद नगरी भरवण्यात आली होती आनंद नगरीत मिकी माऊस झाम्पिग झप्पा याचा आनंद घेताना बाळ विद्यार्थ्यांचा आनंद शिंगे ला पोहोचला होता म्हणून नगरीचा सर्व पालक शिक्षक माता पालक व उपस्थित सर्व ग्राहकांनी मनसोक्त आनंद घेतला आजचा दिवस सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा ठरला आनंदी बाजार यशस्वी व्हावा म्हणून मराठी शाळेचे मुले मुली श्री कदम सर माकुडे सर नितीन मोहोळकर सर मेहेत्रे मॅडम धाउड मॅडम पोले मॅडम वराडे मॅडम ससाने मॅडम साबळे मॅडम काळे मॅडम तसेच मराठी मुली शाळेचे बडे मॅडम निशा कदम मॅडम सिद्धेश्वर मॅडम कानडे मॅडम पवार मॅडम भोसले मॅडम झोरे मॅडम खेडकर मॅडम जाधव मॅडम व जोगदंड सर यांनी विशेष परिश्रम घेतले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी